AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?

व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. "त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?" असा सवाल चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?
चित्रा वाघ, संजीवनी काळे, गजानन काळे
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 14, 2021 | 3:14 PM
Share

मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale MNS) यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjeevani Kale) यांनी पतीविरोधात गंभीर आरोपांची माळ लावली आहे. मानसिक आणि शारीरिक छळासह, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संजीवनी यांनी केला आहे. त्यानंतर खुद्द संजीवनी काळेंनी पाठवलेला एक व्हिडीओ भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

संजीवनी काळे व्हिडीओमध्ये काय म्हणतात?

“नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

“मला म्हणाले, तुला जे हवं ते मी करतो. त्याला घेऊन येतो मी पोलीस स्टेशनमध्ये, अशा पद्धतीने सेटलमेंटची भाषा माझ्यासोबत करण्यात आली आहे, तर चित्राताई मला न्याय हवा आहे, मला भीक नको आहे, मला न्याय हवा आहे, तो पण माझ्या मुलासाठी” अशी मागणी संजीवनी काळे या व्हिडीओच्या अखेरीस करताना दिसतात.

चित्रा वाघ यांची मागणी काय?

“हे काय चाललयं राज्यात, आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलीस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या” अशी मागणी चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ शेअर करत केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीस यांना ट्विटरवर टॅग करत चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाहा चित्रा वाघ यांनी शेअर केलेला संजीवनी काळे यांचा व्हिडीओ

गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल 

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjivani Kale) यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

संबंधित बातम्या :

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

Navi Mumbai | मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून मारहाण, छळवणुकीचा गुन्हा दाखल

आधी विवाहबाह्य संबंधाचा दावा, आता आणखी एक गंभीर आरोप, गजानन काळेंच्या पत्नीने वात पेटवली

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप