मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, तीन अल्पवयीन मुलांसह पाच जण ताब्यात

तक्रारदार दोन युवक आणि दोन युवती कल्याण परिसरातील मलंगगडाच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी तोकडे कपडे घातल्याच्या कारणावरुन वाद घालत 6 ते 8 टवाळखोरांनी या चौघांना बेदम मारहाण केली होती.

मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, तीन अल्पवयीन मुलांसह पाच जण ताब्यात
मलंगगड मारहाण प्रकरणातील पीडित तरुणी
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 6:22 PM

अंबरनाथ : कल्याणमधील मलंगगड परिसरात तरुण-तरुणींना झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली आहे. पाच आरोपींना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. आरोपी हे कुशिवली परिसरातच राहणारे आहेत.

कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार काल उघडकीस आला होता. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी चौघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नव्हती. अखेर ‘टीव्ही9 मराठी’ हे वृत्त उचलून धरल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. सोमनाथ वाघ, अशोक वाघ यांच्यासह एकूण पाच आरोपींना हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

नेमकं काय घडलं?

तक्रारदार दोन युवक आणि दोन युवती कल्याण परिसरातील मलंगगडाच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याच्या कारणावरुन वाद घालत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली होती.

“पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ”

अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर नेवाळी पोलीस चौकी गाठली. तेथे या प्रकाराची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही. हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा दावा चौघांनी केला. मात्र, यातील पीडित तरुणीने हिंमत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला.

संबंधित बातम्या :

मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, चित्रा वाघ पोलिसांवर भडकल्या

VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.