मुंबईत चोरलं, गुजरातमध्ये जमिनीखाली पुरलं, साडेचार लाखांचं सोनं पोलिसांना कसं सापडलं?

आरोपींनी 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत तिजोरीत ठेवलेले लाखो रुपये किमतीचे सोने चोरले आणि गुजरातमधील एका गावात नेऊन जमिनीखाली गाडले. त्यानंतर ते मुंबईला परत आले आणि त्यांनी घरातील कामे करण्यास सुरुवात केली.

मुंबईत चोरलं, गुजरातमध्ये जमिनीखाली पुरलं, साडेचार लाखांचं सोनं पोलिसांना कसं सापडलं?
मुंबईत चोरलेले सोने गुजरातमधून जप्त

मुंबई : मुंबईतून चोरुन नेलेले आणि गुजरातमधील जमिनीच्या आत लपवून ठेवलेले सोने कांदिवली पोलिसांनी शोधून काढले. सोनसाखळी चोरीचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना यश आले असून 4 लाख 57 हजार 306 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत.

तिजोरीची चावी घरातच राहिली

मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात राहणारे एक जोडपे 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अन्यत्र राहायला गेले होते. त्यांनी आपल्या घराची दुरुस्ती आणि संपूर्ण घरात फरशा बसवण्याचे काम दोघा जणांना दिले होते. यावेळी चुकून त्यांच्या तिजोरीची चावी घरातच राहिली.

गुजरातमध्ये जमिनीखाली सोने गाडले

आरोपींनी 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत तिजोरीत ठेवलेले लाखो रुपये किमतीचे सोने चोरले आणि गुजरातमधील एका गावात नेऊन जमिनीखाली गाडले. त्यानंतर ते मुंबईला परत आले आणि त्यांनी घरातील कामे करण्यास सुरुवात केली.

घरातील सोनं गायब

22 तारखेला घरातील दुरुस्ती काम आटोपल्यावर तक्रारदार शंकर शीना पुजारी जेव्हा त्यांचे घर पाहण्यासाठी आले, तेव्हा त्यांना घरातील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळले.

पीडित दाम्पत्याने याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपासादरम्यान पोलिसांनी घरात काम करणाऱ्या एका मजुराला पकडले आणि चौकशी केली असता त्याने सांगितले की हे सोने घरात काम करणाऱ्या दोन्ही मजुरांनी मिळून चोरले होते. त्यानंतर ते गुजरातमधील गावात जमिनीखाली पुरले.

मुंबई पोलिस गुजरातमध्ये

घटनेची माहिती मिळताच कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या शोध पथकाने आरोपींना गुजरातमध्ये नेण्यात आले आणि जमिनीतून सोने जप्त करण्यात आले.

सोन्याचे दागिने आणि रोकड जप्त

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींकडून 4 लाख 57 हजार 306 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दिलीप परमार आणि पंकज कुमार केशरीया मीना अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, हे दोघेही मजूर म्हणून काम करतात.

दुसरीकडे, कांदिवली पूर्वेच्या समतानगर पोलिसांनी तीन महिला चोरांना गेल्याच आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे तीनही महिला जावा होत्या. या तिघी जावा मुंबईच्या बोरिवली, कांदिवली आणि भांडुपमध्ये चोरी करायच्या. बस, ट्रेन आणि अगदी रिक्षातही चोरी करायच्या. गर्दीत जाऊन संधी मिळताच महिलांच्या पर्स, सोने, दागिने आणि पैसे यांच्यावर डल्ला मारायच्या. अखेर या तिन्ही महिला चोरांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.

संबंधित बातम्या :

सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास; नाशिकमध्ये आज सकाळी झालेल्या धाडसी चोरीने खळबळ

लहान-मोठ्या जाऊबाई, मुंबईत महिलांना हेरायच्या, संधी मिळताच पर्स, दागिने चोरी करायच्या, अखेर सोन्याच्या काठीसह बेड्या

दरोड्याचा तयारीतील तिघांना बेड्या, पुणे-कोकणातील नऊ घरफोड्या उघड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI