दरोड्याचा तयारीतील तिघांना बेड्या, पुणे-कोकणातील नऊ घरफोड्या उघड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे आणि परिसर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण अशा एकूण 9 ठिकाणी त्यांनी घरफोडी केल्याचं चौकशीत समोर आलं. दरोड्याचा तयारीत असणाऱ्या तिघा संशयिताना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

दरोड्याचा तयारीतील तिघांना बेड्या, पुणे-कोकणातील नऊ घरफोड्या उघड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात दरोड्याचा तयारीत असणाऱ्या तिघा संशयिताना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडे कसून चौकशी केली असता पुणे आणि परिसर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण अशा एकूण 9 ठिकाणी त्यांनी घरफोडी केल्याचं उघड झालं आहे.

कोणाकोणाला अटक?

दरोड्याचा तयारीत असणाऱ्या तिघा संशयिताना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ राहुल राजू माने, सागर संजय टोळ, सनी महेशकुमार तनेजा अशी या तिघांची नावे असून हडपसर येथील महंमदवाडी येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून स्विफ्ट कार आणि इतर वस्तूंसह जवळपास चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

22 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे आणि परिसर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण अशा एकूण 9 ठिकाणी त्यांनी घरफोडी केल्याचं चौकशीत समोर आलं. यासह इतर ठिकाणी केलेल्या घरफोडीमधील चोरी केलेले 18 लाख 10 हजार 700 रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने, 14 किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 कडून हस्तगत करण्यात आला आहे.

पुण्यातील हडपसरमध्ये बंगल्यात घरफोडी 

दरम्यान, पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. विवेक वसंतराव चोरघडे यांचा शेवाळ वाडीत बंगला आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला विवेक चोरघडे आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण भारत फिरायला गेले होते. 19 ऑगस्टला ते पुण्यात परतले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यात जवळपास 155 तोळे सोनं, 2 किलो चांदी, साडेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोणावळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा

दुसरीकडे, लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक जून महिन्यात समोर आला होता. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली होती. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर महिनाभराने पोलिसांनी मुंबईसह मध्य प्रदेशातून १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करणारे मजूर असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून तीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला

वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, निघताना पाया पडून चोरांनी 500 ​​रुपये दिले, म्हणाले सहा महिन्यांत सगळा ऐवज परत करु

CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI