AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसखाली चिरडून दुचाकीस्वार नवविवाहितेचा मृत्यू, पतीला 55 लाख देण्याचे ‘बेस्ट’ला आदेश

26 वर्षीय संध्या कोठारी टीसीएसमध्ये विजिलन्स सायन्टिस्ट (Vigilance Scientist) म्हणून कार्यरत होती. त्यावेळी तिला 20,000 रुपये मासिक वेतन मिळत होते.

बसखाली चिरडून दुचाकीस्वार नवविवाहितेचा मृत्यू, पतीला 55 लाख देण्याचे 'बेस्ट'ला आदेश
Cash
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : टीसीएसच्या महिला शास्त्रज्ञाच्या अपघाती मृत्यूच्या सहा वर्षांनंतर तिच्या पतीला नुकसान भरपाई मिळणार आहे. मुंबईतील बीकेसी भागात बेस्ट बसखाली चिरडून दुचाकीस्वार महिला शास्त्रज्ञासह तिच्या महिला सहकाऱ्याचा मृत्यू झाला होता. मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) बेस्टला सुमारे 55 लाख रुपये (व्याजासह) तिच्या पतीला देण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

26 वर्षीय संध्या कोठारी टीसीएसमध्ये विजिलन्स सायन्टिस्ट (Vigilance Scientist) म्हणून कार्यरत होती. त्यावेळी तिला 20,000 रुपये मासिक वेतन मिळत होते. अपघाताच्या दिवशी म्हणजेच 27 जून 2015 रोजी दोघी नवविवाहिता (संध्या कोठारी आणि तिची सहकारी-मैत्रीण टिना मोटवानी) खरेदीसाठी आपल्या स्कूटरवर निघाल्या होत्या.

भरधाव बेस्टखाली चिरडून अपघात

यावेळी टीना दुचाकी चालवत होती, तर संध्या मागे बसली होती. मुंबईतील बीकेसी भागात झालेल्या अपघातात भरधाव बेस्ट बसखाली त्या चिरडल्या गेल्या. अपघातात दोघींना गंभीर जखमा झाल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान दोघींचीही प्राणज्योत मालवली. त्यानंतर संध्याचा पती पियुष कोठारीने सप्टेंबर 2015 मध्ये मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

विनापरवाना बाईकस्वाराच्या धडकेत अपघाती मृत्यूचे प्रकरण

यापूर्वी, लायसन्सशिवाय बाईक चालवणाऱ्या तरुणाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या 48 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई (Accident Victim Family Compensation) देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले होते. गेल्या काही वर्षांत नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारी ही सर्वोच्च रक्कम मानली जाते.

काय घडलं होतं

48 वर्षीय रामचंद्र झोरे मुंबई महापालिकेत अॅम्ब्युलन्स चालक म्हणून कार्यरत होते. 27 मार्च 2013 रोजी नागपाडा परिसरात झोरे रस्ता ओलांडत असताना एका बाईकने त्यांना उडवलं होतं. वाहन चालक परवाना नसलेल्या 18 वर्षीय मोहम्मद अश्रफ कुरेशीने बेदरकारपणे गाडी चालवत झोरे यांना धडक दिल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

विनापरवाना बाईकस्वाराच्या धडकेत मृत्यू, मृताच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.