VIDEO | कॉलर खेचून वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाची मारहाण, मुंबईत तिघांना अटक

मुंबईतील गोरेगाव भागात बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला होता. तृतीयपंथीयाने केवळ पोलिसांनाच मारहाण केली नाही, तर वाहतूक पोलिसांची कॉलरही खुलेआमपणे ते ओढताना कॅमेरात कैद झाले होते.

VIDEO | कॉलर खेचून वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाची मारहाण, मुंबईत तिघांना अटक
मुंबईत पोलिसांना तृतीयपंथीयाची मारहाण


मुंबई : ट्राफिक पोलिसांना मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पादचारी आणि रिक्षा चालकाच्या भांडणात पडून तृतीयपंथीयाने पादचाऱ्याशी वाद घातला होता. त्यांच्यात मध्यस्थी करायला आलेल्या वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने मारहाण केल्याचं समोर आलं होतं. मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटने प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव भागात बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला होता. तृतीयपंथीयाने केवळ पोलिसांनाच मारहाण केली नाही, तर वाहतूक पोलिसांची कॉलरही खुलेआमपणे ते ओढताना कॅमेरात कैद झाले होते. ट्रॅफिक पोलिसांसोबत केलेल्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये किन्नर आपले कपडे काढून पोलिसांना मारहाण करताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

बांगूर नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षाला धडक दिल्यानंतर संबंधिक तृतीयपंथी रिक्षा चालकाच्या समर्थनार्थ आला आणि एका माणसाशी त्याने भांडायला सुरुवात केली. वाहतूक पोलीस हवालदार पादचाऱ्याच्या बचावासाठी गेला, तेव्हा तृतीयपंथीयाने पोलिसांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे.

पाहा व्हिडीओ :

मध्य प्रदेशात तृतीयपंथीयाला मारहाण

दुसरीकडे, मध्य प्रदेशमध्ये एका तृतीयपंथीयाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. होशंगाबादमध्ये एका तरुणाने तृतीयपंथीयाला बेदम मारहाण करुन या मारहाणीचा व्हिडीओ शूट करत तो व्हायरलही केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण?

होशंगाबादच्या ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन परिसरात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. पोलीस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक प्रवीण मालवीय यांनी माहिती देताना सांगितले होते की, एका बदमाशाने तृतीयपंथीयाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओमध्ये हा तरुण किन्नराला कानशिलात लगावण्यासह क्रूरपणे लाथा मारताना दिसत आहे. आरोपीने त्याच्या एका साथीदाराकडून या मारहाणीचा व्हिडीओ बनवून घेतला आहे.

आरोपीची ओळख पटली

व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण झालेल्या तृतीयपंथीयाचा शोध घेण्यात आला. त्याचवेळी, मारहाण करणाऱ्या गुंडाचे नाव मार्शल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली होती.

नाशिकमध्ये टोलनाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा

दरम्यान, नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर 17 ऑगस्टला तृतीयपंथीयांचा राडा बघायला मिळाला होता. शिंदे टोलनाक्यावर तृतीयपंथी जबरदस्ती प्रवाशांकडे पैशांची मागणी करत होते. यावेळी एका गाडीतील प्रवाशांसोबत त्यांनी वाद घालत बाचाबाची केली. तृतीयपंथीयांनी प्रवाशांना शिवीगाळ केली. नंतर तीन ते चार तृतीयपंथीयांनी मिळून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवाशांनी देखील तृतीयपंथीयांच्या मारहाणीचा प्रतिकार केला. त्यामुळे दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर

तृतीयपंथीयाला बेदम मारहाण करुन व्हिडीओ शूट, सराईत गुंडाची मुजोरी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI