Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापाच्या हत्येचा प्रयत्न, अंबरनाथमध्ये सावत्र मुलांवर गुन्हा

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात नरेंद्र सिंग हा पत्नी किरणदेवी आणि दोन सावत्र मुलांसह राहतो. नरेंद्र हा सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने मुलांना हे सहन होत नव्हतं.

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापाच्या हत्येचा प्रयत्न, अंबरनाथमध्ये सावत्र मुलांवर गुन्हा
अंबरनाथमध्ये मुलांनी बापाच्या डोक्यात दगड घातलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 3:49 PM

अंबरनाथ : बापाच्या डोक्यात दगड घालून रस्त्यावर टाकून देणाऱ्या मुलांवर हत्येच्या प्रयत्नाचा (Attempt to Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात (Thane Crime) रविवारी रात्री ही घटना घडली होती. बाप सारखा सारखा आईला मारत असल्यानं डोक्यात दगड घातल्याची कबुली मुलांनी दिली. यानंतर गुन्हा दाखल करत या दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या बापाला उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात नरेंद्र सिंग हा पत्नी किरणदेवी आणि दोन सावत्र मुलांसह राहतो. नरेंद्र हा सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने मुलांना हे सहन होत नव्हतं. त्यातच रविवारी पुन्हा नरेंद्रने पत्नीला जीवघेणी मारहाण करत जखमी केलं. त्यामुळे त्याच्या सावत्र मुलांनी थेट नरेंद्रच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला रस्त्यावर तडफडत टाकून दिलं.

मुलांची कबुली

काही गावकऱ्यांनी त्याला पाहिल्यानंतर उचलून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेलं असता तिथे त्याच्या पत्नीला उपचारांसाठी मुलांनी आधीच आणल्याचं दिसून आलं. त्यांना विचारलं असता, बाप सारखा सारखा आईला मारत असल्यानं आम्हीच डोक्यात दगड घातल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या नरेंद्रला उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आलं.

सावत्र पोरांवर गुन्हा

दरम्यान, नरेंद्रची पत्नी किरणदेवी हिच्या तक्रारीवरून रविवारी नरेंद्रच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. तर आज नरेंद्र याच्या तक्रारीवरून त्याची सावत्र मुलं मुन्ना उर्फ सूरज रामबाबू सिंग आणि मनीष रामबाबू सिंग यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

 युवतीचा डोके छाटलेला मृतदेह आढळला, चंद्रपूरमध्ये खळबळ

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली

Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.