CCTV | डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलरवर चाकू हल्ला, पण दुकानात एकाही वस्तूला स्पर्शही नाही

CCTV | डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलरवर चाकू हल्ला, पण दुकानात एकाही वस्तूला स्पर्शही नाही
डोंबिवलीत ज्वेलरवर हल्ला
Image Credit source: टीव्ही 9

डोंबिवली पूर्वेच्या आगरकर रोडवर मन्ना गोल्ड नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी या दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना हे दुकानात बसलेले असताना एका अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

निनाद करमरकर

| Edited By: अनिश बेंद्रे

May 18, 2022 | 3:29 PM

डोंबिवली : दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स व्यापाऱ्यावर चाकू हल्ला (Knife Attack) करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस (Thane Dombivali Crime News) आली आहे.डोंबिवली पूर्व भागातील मन्ना गोल्ड या दुकानात हा प्रकार घडला. चाकू हल्ल्याची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहे. दुकानातली कोणत्याही वस्तूला हल्लेखोरांनी साधा हातही न लावल्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पूर्वेच्या आगरकर रोडवर मन्ना गोल्ड नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी या दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना हे दुकानात बसलेले असताना एका अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

कोणतीही वस्तू चोरली नाही

या हल्लेखोराने तोंडाला मास्क लावला होता. तसंच दुकानातली कोणतीही वस्तू त्याने चोरून नेली नाही. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर जखमी तारकनाथ मन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना याबाबत विचारलं असता, तपास सुरू असून लवकरच संपूर्ण प्रकरणाचा छडा लावू, असं त्यांनी सांगितलं. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें