ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप

ठाण्यात वर्तक नगर भागात राहणाऱ्या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा आरोप आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्याला मैत्रिणींना पाठवला होता.

ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप
पतीच्या त्रासाला कंटाळून ठाण्यात महिलेचा गळफास

ठाणे : सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यातील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी तिने आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचणारा व्हिडीओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठवला होता. रडत-रडत शूट केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाला घरं पडली आहेत.

काय आहे व्हिडीओ

ठाण्यात वर्तक नगर भागात राहणाऱ्या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा आरोप आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्याला मैत्रिणींना पाठवला होता. नवरा कसा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजारी असतानाही डॉक्टरकडे न नेता, तू मेलीस तरी चालेल, असे सुनावतो, याविषयी तिने व्हिडीओमध्ये सांगितले होते.

शिलाई मशीन वापरण्यासही मनाई

सासरची माणसं आपल्याला खर्चासाठी एक छदाम देत नाहीत. त्यामुळे आपण एक-एक पैसे जोडून शिलाई मशीन घेतली, तर तिचा वापर करण्यासही आपल्याला मनाई केली पीडितेने रडत रडत सांगितले आहे. आपण घेत असलेल्या टोकाच्या निर्णयाबद्दल तिने आपल्या आई-वडिलांचीही माफी मागितली आहे. महिलेच्या आत्महत्येविषयी माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

झारखंडमध्ये विवाहितेची आत्महत्या

दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये उघडकीस आली होती. आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. पती आणि सासरच्या मंडळींनी आपला हुंड्यासाठी जाच केल्याचा आरोप तिने व्हिडीओत केला होता. सॉरी पापा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली, असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

दोन चिमुरड्यांना खाडीत सोडून आई गेली कुठे? डोंबिवलीतील मन हेलावून टाकणारी घटना

Ayesha Khan Suicide | ‘दुआओं में याद रखना’, नवऱ्याला व्हिडीओ पाठवला, नदीत उडी घेत विवाहितेची आत्महत्या

सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI