सासऱ्याचे सूनेवर वार, घर पेटवून गळफास घेत आत्महत्या, बदलापुरातील धक्कादायक प्रकार

बदलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पेटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सासऱ्याचे सूनेवर वार, घर पेटवून गळफास घेत आत्महत्या, बदलापुरातील धक्कादायक प्रकार
प्रातिनिधीक छायाचित्र

बदलापूर (ठाणे) : बदलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पेटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सासऱ्याने आधी सूनेवर नेमके वार का केले? या घटनेमागे नेमकं कारण काय, त्यांच्यात वाद कोणत्या विषयावर झाले होते? असा सवाल आजूबाजूच्या स्थानिकांना पडत आहेत.

नेमकं काय घडलं?

बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. बुधवारी (13 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता, तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात असताना या दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाले. या वादात जाधव यांनी सुनेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर सुनेनं आरडाओरडा केल्यानं शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेलं.

सासऱ्याची आत्महत्या

या घटनेनंतर किसन जाधव यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कपाट लावलं आणि संपूर्ण घर पेटवून दिलं. यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या घरातून धूर निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलानं जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण घर जळून खाक झालं होतं, तर जाधव हे अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाधव यांना तातडीने इमारतीखाली आणलं असता इमारतीच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला.

सूनेवर रुग्णालयात उपचार सुरु

दरम्यान, जाधव यांच्या जखमी सुनेवर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र इतका मोठा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेमुळे बदलापूर शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरात दिराकडून वहिनीला मारहाण

दुसरीकडे उल्हासनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हातगाडीची पालिकेत तक्रार केल्याच्या संशयावरुन दिराने आपल्या वहिनीला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडलीये. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदूमल रहेजा याची हातगाडी आहे. उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं बुधवारी अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई सुरू असताना चंदूमल याच्याही हातगाडीवर कारवाई करण्यात आली. या हातगाडीजवळच चंदूमल याची वहिनी अंजली रहेजा यांचं दुकान आहे. त्यामुळे अंजली यांनीच आपल्या हातगाडीची तक्रार पालिकेत केल्याचा संशय चंदूमल याला आला.

याच संशयातून चंदूंमल आणि अंजली यांच्यात वाद झाला. यावेळी चंदूमला आणि त्याचा मुलगा दिनेश या दोघांनी मिळून अंजली रहेजा यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर अंजली यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून अंजली यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत उल्हासनगर पोलिसांनी चंदूमल रहेजा आणि दिनेश रहेजा या दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा :

वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या

पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात पार घातली, रक्तबंबाळ पित्याचा तडफडून मृत्यू, सांगलीतील वेदनादायी घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI