Mumbai Leopard : गोरेगावात पुन्हा बिबट्याची दहशत, व्हिडीओही समोर! नागरी निवारा संकुलात बिबट्याचा वावर

Mumbai Leopard : आता पुन्हा एकदा या परिसरात बिबट्या दिसून आल्यात भीतीचं वातावरण पसरलंय.

Mumbai Leopard : गोरेगावात पुन्हा बिबट्याची दहशत, व्हिडीओही समोर! नागरी निवारा संकुलात बिबट्याचा वावर
गोरेगावात दिसला बिबट्या
Image Credit source: TV9 Marathi
गोविंद ठाकूर

| Edited By: सिद्धेश सावंत

Aug 06, 2022 | 2:40 PM

मुंबई : मुंबईच्या आरे कॉलनीत अनेकदा बिबट्या (Leopard) कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान, आता आरेला (Aarey Colony) खेटूनच असलेल्या एनएनपी (Goregaon NNP) म्हणजेच नागरी निवारा संकुलातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्ण इथं बिबट्या दिसून आला. आरे जंगलालगतच नागरी निवारा भाग लागूनच आहे. या भागात शुक्रवारी रात्री बिबट्या दिसून आला आहे. बिबट्या संरक्षक भिंतीच्या वर मोकाटपणे फिरताना दिसून आलाय. गोरेगावच्या आरे जंगाललगतच्या भागात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन होऊ लागल्यानं लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर आता पुन्हा दिवसाढवळ्याही बिबट्या आढळून आला तर काय करायचं, असा प्रश्नही लोकांना सतावू लागलाय.

शुक्रवारी रात्री 11 वाजता 19 ई गार्डन हिल सोसायटी, गोरेगाव पूर्व येथील जंगलाला लागून असलेल्या नागरी निवारा संकुलात बिबट्या वावर कॅमेऱ्यात कैद झाला होता. या बिबट्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये बिबट्या संरक्षक भिंतीवरुन झेपावत खाली उतरताना दिसून आला आहे.

पाहा व्हिडीओ :

आरेच्या जंगलात बिबट्या अनेकदा दिसून आला आहे. याआधी आरेतील रहिवाशांवर झालेले बिबट्याचे हल्लेही कॅमेऱ्यात अनेकदा कैद झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा या परिसरात बिबट्या दिसून आल्यात भीतीचं वातावरण पसरलंय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान बिबट्या आढळून आल्यामुळे आता या भागातील वन कर्मचारीही सतर्क झाले आहेत. तसंच लोकांनाही सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें