Ganja Smuggling : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, चार जणांना अटक

अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी मुंबईतील रहिवासी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत विविध ठिकाणी ते गांजाचा पुरवठा करत होते. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Ganja Smuggling : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, चार जणांना अटक
गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
ब्रिजभान जैस्वार

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 28, 2022 | 7:23 PM

मुंबई : एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई करत गांजा तस्करी रॅकेट (Ganja Smuggling Racket)चा पर्दाफाश केला आहे. गांजा तस्करी प्रकरणी एनसीबीकडून चार जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण 4 कोटी रुपयांचा 190 किलो गांजा एनसीबीने जप्त (Seized) केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन कारही ताब्यात घेतल्या आहेत. अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी मुंबईतील रहिवासी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत विविध ठिकाणी ते गांजाचा पुरवठा करत होते. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपी हा गांजा कुणाकडे पोहचवणार होते याचाही तपास पोलीस करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून गांजा जप्त केला

ओडिसातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधला. आरोपी पडघा, भिवंडी, ठाणे या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टोल प्लाझावर सापळा रचला. यावेळी पोलिसांना संशयित वाहने येताना दिसताच पोलिसांनी टोल प्लाझावर त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्या वाहनांची झडती घेतली असता गाडीतून 190 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या व्यक्तींची चौकशी केली असता आपण गांजा तस्करी करत असल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपी गेल्या पाच वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात आहेत.

गांजा लागवडीचे केंद्र असलेल्या आंध्र प्रदेश आणि ओडिसा भागातून गांजा मुंबईत आणला जात असल्याची माहिती मिळते.  मात्र आंध्र प्रदेश आणि ओडिसातून कुणाकडून गांजा घेऊन मुंबईत कुणाला विकतात याबाबत पोलीस तपास करत आहेत. रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराबाबतही माहिती घेत आहेत. (Mumbai NCB busts inter-state ganja smuggling gang, arrests four accused)


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें