AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साकीनाका बलात्कार प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक, मुंबई पोलीस आयुक्तांकडून 3 महत्त्वाच्या अपडेट

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांचा नेमका तपास कुठपर्यंत झालाय याबाबतची माहितीस देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.

साकीनाका बलात्कार प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक, मुंबई पोलीस आयुक्तांकडून 3 महत्त्वाच्या अपडेट
हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 3:44 PM
Share

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांचा नेमका तपास कुठपर्यंत आलाय याबाबतची माहितीस देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे नेमकं काय म्हणाले?

“दोन दिवसांपूर्वी साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत माहिती दिली होती. या प्रकरणी जो तपास समोर आला आहे. त्याबाबत माहिती देणार आहोत. याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीचा मेसेज पसरवला जातोय. त्यामुळे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माहिती देतोय”, असं आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं.

आरोपी विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

“पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अ‍ॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आपण आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

वकील राजा ठाकरे यांची नेमणूक

“घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केलं आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत”, असं नगराळे यांनी सांगितलं.

पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री 20 लाखांची मदत करणार

“नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आज दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल”, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.

संबंधित बातम्या :

साकीनाका बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला? मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून सविस्तर माहिती

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.