मालाने भरलेला ट्रक रिक्षावर उलटला! रिक्षाचालक जागीच ठार, ऐरोली दिवा सर्कलजवळ भीषण अपघात

Navi Mumbai Accident News : माल वाहून नेणारा हा ट्रक वाशी हून मुंबईच्या दिशेने निघाला होते. दरम्यान, वाटेतच या ट्रकच्या टायर फुटला आणि हा ट्रक जागच्या जागी कोलमडला.

मालाने भरलेला ट्रक रिक्षावर उलटला! रिक्षाचालक जागीच ठार, ऐरोली दिवा सर्कलजवळ भीषण अपघात
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:27 AM

नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai Accident) ऐरोलीत विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला. नवी मुंबईच्या ऐरोली (Airoli News) दिवा सर्कलजवळ हा भीषण अपघात झाला. एक ट्रक रिक्षावर (Truck Rikshaw Accident) पलटी झाला. मालाने भरलेला हा ट्रक थेट रिक्षावरच उलटल्यामुळे रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षा चालक ट्रकच्या खाली दबला गेला, त्यामुळे त्याला जीव वाचवण्यासाठी जराही वेळ मिळाला नाही आणि ट्रक खाली आल्यानं रिक्षा चालकांन जागीच जीव गमावला. या अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. तर ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचां संशय घेतला जातोय. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं ट्रक बाजूला घेण्यास सुरुवात केली होती. या भीषण अपघातामुळे नवी मुंबईतील अपघाताचं सत्र सुरुच असल्याच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

का पलटी झाला ट्रक?

माल वाहून नेणारा हा ट्रक वाशी हून मुंबईच्या दिशेने निघाला होते. दरम्यान, वाटेतच या ट्रकच्या टायर फुटला आणि हा ट्रक जागच्या जागी कोलमडला. या ट्रकमध्ये् मोठ्या प्रमाणात चवळीच्या गोण्या होत्या. प्रचंड वजन असल्याकारणानं ट्रकचा टायर फुटून बॅलन्स केला आणि हा ट्रक पलटी झाला.

ट्रक खाली रिक्षाचालक दबला गेला

या वेळी रस्त्या लगत एख रिक्षा उभी होती. ट्रक थेट या रिक्षावरच कोसळला होता. या रिक्षा पूरणपणे चेपली गेली. दुर्दैवानं रिक्षाचा चालकही यावेळी आत बसलेला होता. रिक्षाचालकाचा ट्रेकखाली दबल्यानं दुर्दैवी अंत झाला.

हे सुद्धा वाचा

या अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सध्या नवी मुंबई पोलिसांकडून या अपघात प्रकरणी अधिक तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.