लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, शिवसेना नेत्यावर अखेर गुन्हा दाखल

लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन करणं एका शिवसेना नेत्याला भोवलं आहे (Navi Mumbai police regiter case against shivsena leader Suresh Kulkarni).

लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, शिवसेना नेत्यावर अखेर गुन्हा दाखल
लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, शिवसेना नेत्यावर अखेर गुन्हा दाखल

नवी मुंबई : लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन करणं एका शिवसेना नेत्याला भोवलं आहे. नवी मुंबईत माजी नगरसेवक सुरेश कुळकर्णी यांनी वाढदिवसानिमित्त शहरातील मुख्य वर्दळीच्या भागातच गर्दी जमवून वाढदिवसाचा जल्लोष साजरी केला होता. सुरेश कुळकर्णी यांनी तूर्भे परिसरात गजबजलेला रस्ता अडवून फटाक्यांची आतषबाजी केल्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रसारित केलं होतं. याच बातमीची दखल घेऊन MIDC तूर्भे पोलिसांनी अखेर सुरेश कुळकर्णी यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. MIDC तूर्भे पोलिसांनी कलम 188, 269, 270 यांसह साथीचे रोग अधिनियम 1897 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे (Navi Mumbai police regiter case against shivsena leader Suresh Kulkarni ).

बर्थडे सेलिब्रिशेनच्या वेळी शेकडो नागरिक आणि पोलीस उपस्थित

तुर्भे स्टोअर येथील ठाणे बेलापूर रस्ता अडवून शिवसेना नेते सुरेश कुळकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करण्यात आली. फटाके फोडून आतषबाजी केल्याचे फोटो-व्हिडीओही समोर आले आहेत. विशेष म्हणजे परिसरातील शेकडो नागरिक आणि पोलीस देखील उपस्थित होते (Navi Mumbai police regiter case against shivsena leader Suresh Kulkarni).

बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ बघा :

कोण आहेत सुरेश कुळकर्णी?

सुरेश कुळकर्णी हे नवी मुंबईतील माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. कुलकर्णी यांनी महापालिकेत महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सुरेश कुळकर्णी हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. नुकताच त्यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजपवासी नेते गणेश नाईक यांचे ते खंदे समर्थक मानले जात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले होते. कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हजेरी लागल्यानंतरच त्यांची राजकीय दिशा ओळखली जात होती.

संबंधित बातमी : नवी मुंबईत शिवसेना नेत्याचे भररस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, गर्दी जमवून आतषबाजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI