NCB ची नालासोपाऱ्यात धडक कारवाई, कोकेन-मेफेड्रॉन जप्त, नायजेरियन नागरिकासह दोघे अटक

एनसीबी मुंबईच्या पथकाने ब्लेसिंग एडविन ओकेरेके नावाच्या नायजेरियन नागरिकत्व असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. बुधवारी त्याच्याकडून नालासोपारा येथे मेफेड्रोन आणि कोकेन जप्त करण्यात आले.

NCB ची नालासोपाऱ्यात धडक कारवाई, कोकेन-मेफेड्रॉन जप्त, नायजेरियन नागरिकासह दोघे अटक
एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 11:30 AM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्सविरुद्ध सातत्याने लढा देत आहे. ठाणे आणि नालासोपारा भागात धडक कारवाई करत एनसीबीने कोकेन आणि मेफेड्रॉन ड्रग्जसाठा जप्त केला आहे. एका नायजेरियन नागरिकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (NCB seizes cocaine mephedrone drugs from Nalasopara Nigerian among two held)

मीरा रोडमध्ये कोकेन जप्त

गोपनीय माहितीच्या आधारे एनसीबी मुंबईच्या पथकाने मीरा रोड पोलिसांच्या मदतीने सफ्रान फारुक लकडावाला या भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले. काशिमीरा नाका चौक, मीरा रोड पूर्व भागातून मंगळवारी त्याच्याकडून कोकेन ड्रग्ज जप्त केले. सफ्रानने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर एनसीबी मुंबईच्या पथकाने ब्लेसिंग एडविन ओकेरेके नावाच्या नायजेरियन नागरिकत्व असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. बुधवारी त्याच्याकडून नालासोपारा येथे मेफेड्रोन आणि कोकेन जप्त करण्यात आले.

आरोपींची मोडस ऑपरेंडी उघड

कारवाई दरम्यान एनसीबीने आरोपींची एक अनोखी मोडस ऑपरेंडी उघडकीस आणली. आरोपी सफ्रान फारुक लकडावाला हा कोकेन ड्रग्ज हवाई मार्ग आणि रस्ते मार्गाने भारताच्या विविध शहरांमध्ये पोहोचवण्याचं काम करत होता. तो दिल्ली आणि मुंबईहून विविध आफ्रिकन नागरिकांकडून ड्रग्जची खरेदी करत होता. त्यानंतर खरेदी केलेले ड्रग्ज तो भारतातील इतर राज्यात सप्लाय करत असल्याचे समोर आले आहे. एनसीबी मुंबईने या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या:

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनर उरणच्या बंदरावर उतरवला, कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य समोर

इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा

(NCB seizes cocaine mephedrone drugs from Nalasopara Nigerian among two held)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.