Video: समुद्रकिनाऱ्यावरुन कार पळवताना ओली वाळू सरकली! मारुती सुझुकीची अर्टीगा अर्नाळा समुद्रात अडकली

संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाळूत रुतून बसलेली ही कार बाहेर काढण्यासाठी स्थानिकांसह काही पर्यटकही मदतीसाठी पुढे सरसावले.

Video: समुद्रकिनाऱ्यावरुन कार पळवताना ओली वाळू सरकली! मारुती सुझुकीची अर्टीगा अर्नाळा समुद्रात अडकली
.. कार समुद्राच्या पाण्यात अडकलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 8:49 AM

पालघर : समुद्रकिनाऱ्यावर (Arnala Sea Viral Video) कार चालवण्यास मनाई आहे. पण काही पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर कार घेऊन जाणं चांगलंच अंगलट आलं. अर्नाळा (Palghar Arnala Car Video) समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात मारुती सुझुकीची अर्टिगा ही गाडी वाळूत रुतली. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. समुद्राच्या किनाऱ्यावरुन ओल्या वाळूत काही पर्यटकांना कार चालवण्याचा प्रयत्न केला. पण समुद्राच्या भरतीच्या पाण्यात ही कार अडकली आणि वाळूमध्ये रुतून बसली. बराच वेळ ही कार वाळूतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण चाकं गोल फिरल्यानंतर ही कार वाळूमध्ये अधिकच खोलवर रुतत होती. भिवंडीतून (Bhiwandi) आलेल्या दोघा पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर कार चालवणं यावेळी चांगलंच महागात पडलं. वाळूत रुतलेली कार बाहेर काढताना पर्यटकांच्या नाकीनऊ आले होते.

कधीची घटना?

रविवारी दुपारी भिवंडीतून दोघेजण अर्नाळा किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी आले होते. अर्नाळ समुद्र किनाऱ्यावर आले असता या पर्यटकांना किनाऱ्यावर कार चालण्याचा मोह आवरता आला नाही. अखेर त्यांनी किनाऱ्यावर कार घातली आणि समुद्र किनाऱ्याच्या कडेकडेने जात असताना भरतीच्या पाण्यात ही कार अडकली.

हे सुद्धा वाचा

अर्नाळ ते राजोडी समुद्रा किनाऱ्यावर भरधाव वेगानं हे पर्यटक कार पळवत होते. स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. पण पर्यटक काही ऐकले नाहीत. अखेर समुद्र किनाऱ्यावरुन गाडी चालवणं या पर्यटकांना भारी पडलं.

पाहा व्हिडीओ :

संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाळूत रुतून बसलेली ही कार बाहेर काढण्यासाठी स्थानिकांसह काही पर्यटकही मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी धक्का देत ही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. एक फॉरच्युनर कारही अर्टिगाच्या मदतीसाठी आल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय. त्यानंतर अथक प्रयत्नांनी ही कार वाळूतून बाहेर काढण्यात यश आलं.

स्टंटबाजी नकोच!

दोन दिवसांनंतर कार वाळूत रुतून बसलेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अतिउत्साही पर्यटकांतं पितळ उघडं पडलंय. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ मदत केल्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टळलाय. दरम्यान, अर्नाळा, राजोडी, कळंब, या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी आनंद घ्यावा पण अतिउत्साहीपणा दाखवू नये. अन्यथा आपला मोठा अपघात होऊ शकतो हेच या घटनेवरुन अधोरेखित झालंय.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.