AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : …आणि मृत्यूने गाठलच! वीज खांब धावत्या दुचाकीवर पडून स्फोट, 20 फूट लांब फेकला गेला, जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा वीज खांब कोसळल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वीज खांब कोसळल्यानंतर जखमी योगेश यांना वाचवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. पण...

Video : ...आणि मृत्यूने गाठलच! वीज खांब धावत्या दुचाकीवर पडून स्फोट, 20 फूट लांब फेकला गेला, जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
भीषण..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 6:49 AM
Share

पालघर : मंगळवारी पालघरमधील (Palghar News) वीज खांब धावत्या बाईकवर कोसळला होता. यावेळी झालेल्या भीषण (Palghar Accident) स्फोटात दुचाकीस्वार तरुण काही फूट अंतरावर फेकला गेला. गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण या तरुणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान, या तरुणाचा मृत्यू झाला आहे. योगेश पागधरे (Yogesh Pagdhare) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते कामावर जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळला होता. यात त्यांना जबर मार बसला होता. तर दुचाकीचाही चक्काचूक झाला होता. तारामू एमआयडीसी येतील बोईसर-नवापूर रस्त्यावर कोलवडे नाका इथं हे घटना घडली. अचानक वीज खांब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दुर्दैवानं याच वेळी विजेच्या थांबाखाली पागधरे हे रस्त्यावरुन जात असतेवेळी चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेत योगेश यांच्या झालेल्या मृत्यूमुळे पागधरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

मृत्यूशी झुंज अपयशी

योगेश पागधरे गे टाटा स्टील या कंपनीत कामाला होते. ते कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीवर निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे विजेचा कमकुवत झालेला खांब थेड दुचाकीवर कोसळला आणि भीषण स्फोटही झाला. विद्युत वाहक तारांसह हा विजेचा खांब कोसळल्यानं स्फोट होऊन आजूबाजूचा परिसरही हादरुन गेला. या दुचाकीचा चक्काचूर झाला, तर दुचाकीस्वार योगेश गंभीररीत्या जखमी झाले.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा वीज खांब कोसळल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, वीज खांब कोसळल्यानंतर जखमी योगेश यांना वाचवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. रस्त्यावर अससलेल्या दुसऱ्या एका दुचाकी चालकानं योगेशला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही फसला आणि मदत करण्यासाठी पुढे आलेला तरुणही 10 ते 12 फूट लांब फेकला गेला.

या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वितरण कंपनीचे कर्मचारीही दाखल झाले. जखमी योगेश पागधरे यांना रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची प्रकृत खालावत चालली होती. अखेर त्यांना मीरा रोड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. पण उपचादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.