मुंबईत बॉम्बस्फोट होणार असा फोन करणारी व्यक्ती गजाआड; डहाणूमधून अटक

मुंबईत बाँबस्फोट होणार अशी माहिती पोलिसांना देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होतात का त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

मुंबईत बॉम्बस्फोट होणार असा फोन करणारी व्यक्ती गजाआड; डहाणूमधून अटक
आश्रमात अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 12:04 AM

मुंबईः मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाँब ठेवल्याचे फोनवरून पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनीही फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास चालू केले. त्यानंतर काही काळातच मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशा माहितीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला पालघर, डहाणूमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अश्विन महिसकर असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती अश्विन महिसकर यांनी दिली होती असं आता पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, डिगडोह येथील रहिवासी आहे. त्याची आता माहिती घेण्याचे काम पोलीस करत असून या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा यामध्ये समावेश आहे का त्याचा तपास पोलीस करत आहेत.

मुंबईतील नलबाजार, मेहंदी बाजार आणि जेजे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची नागपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तपासाची सूत्रे गतिमान करून या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून या प्रकरणाची माहिती मिळाली असली तरी त्याचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का त्याचा शोध पोलीस करत आहेत.

ज्या प्रकारे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते महानायक अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि धर्मेंद्र यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. ही माहितीही नागपूर पोलिसांनी फोन करूनच देण्यात आली होती.

नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना देऊन या प्रकरणाचा तपास करुन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.