मुंबै बँकेतील बोगस कर्ज प्रकरण पुन्हा चर्चेत, प्रवीण दरेकरांनी आरोप फेटाळले

मुंबै बँकमध्ये बोगस कर्ज प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. मात्र, बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत (Pravin Darekar denies allegations on MDCB bank).

मुंबै बँकेतील बोगस कर्ज प्रकरण पुन्हा चर्चेत, प्रवीण दरेकरांनी आरोप फेटाळले
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 6:53 PM

मुंबई : मुंबै बँकमध्ये बोगस कर्ज प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. नाबार्डच्या आदेशावरून बॅंकेच्या दक्षता पथकाच्या चौकशीत समोर बोगस कर्जाचं प्रकरण समोर आल्याचं बोललं जातं आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व राजकारण असून सत्ताधाऱ्यांकडून द्वेषापोटी हे सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे (Pravin Darekar denies allegations on MDCB bank).

नेमकं प्रकरण काय?

मुंबै बॅंकच्या कार्यपद्धतीवर आणि कर्ज देण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. मुबै बँकेच्या ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर, अंधेरी पूर्व आदी शाखांमध्ये बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार होत असल्याची तक्रार एका सभासदाने थेट नाबार्डकडे केली होती. त्यानंतर बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या तपासणीतून काही कर्ज प्रकरण बोगस आढळून आली आहेत. बँकेशी संबंधित काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणत्याही प्रकरणात कर्जव्यवहाराचे करारपत्र न करताच, पात्रतेपेक्षा अधिक कर्ज मंजूर केल्याचं अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत (Pravin Darekar denies allegations on MDCB bank).

दरेकरांनी चौकशीला सामारे जावं, काँग्रेसच्या थोरातांची भूमिका

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य केले आहे. जसे इतरांना चौकशीला सामोरे जा, असं दरेकर म्हणतात. त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा या चौकशीला सामोरं जावं, असं मत थोरात यांनी मांडलं आहे. प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातील सर्व आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी राजकारण होत आहे. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी एकवेळा नाही तर 100 वेळा तयार आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

“शिळ्या काढिला उत आण्याचं प्रयत्न आहे. दोन वेळा पिटीशन झाली काही सापडलं नाही. को-ऑपरेटीव्हची सुद्धा चौकशी झाली. मी सरकारवर टीका करतो. त्यामुळे विद्वेषपोटी चौकशी केली. पोलिसांनी सी समरी केली आहे. तरी सुद्धा पुन्हा उकरून काढयाचा प्रयत्न आहे. माझे राजकीय विरोधक प्रकाश सुर्वेंचे पार्टनर पंकज कोटेचाच्या मार्फत हे सर्व केले जात आहे.त्या कोटेचाचा मुंबै बॅंकशी काही संबंध नाही. पण पुन्हा सर्व माहिती दिली जाईल आणखीन 100 वेळा चौकशी झाली तरी तयार आम्ही पूर्ण सहकार्य करू”, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली.

संबंधित बातमी :

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात ऑडिट होणार

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.