AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Airport : विमानतळावर मराठी पाट्या लावा; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

राज्यात प्रत्येक दुकानावर मराठी भाषेत फलक लावण्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला होता. मात्र आता मुंबई विमानतळावर इंग्रजीसह मराठीत देखील फलक लावण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका गुजराती विचार मंचातर्फे दाखल करण्यात आली आहे.

Mumbai Airport : विमानतळावर मराठी पाट्या लावा; हायकोर्टात जनहित याचिका दाखल
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 30, 2023 | 7:47 PM
Share

मुंबई : देशातील वर्दळीच्या प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नामफलक तसेच अन्य माहिती फलक इंग्रजीसोबत मराठी भाषेत ठळकपणे लावण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने सोमवारी या याचिकेची गंभीर दखल घेतली. मात्र सुनावणी घेण्यापूर्वी याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांची अनामत रक्कम भरण्याची आदेश दिले. विशेष म्हणजे गुजराती विचार मंचतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर दोन आठवड्यांत याचिककर्त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

गुजराती विचार मंचातर्फे जनहित याचिका दाखल

राज्यात प्रत्येक दुकानावर मराठी भाषेत फलक लावण्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला होता. मात्र आता मुंबई विमानतळावर इंग्रजीसह मराठीत देखील फलक लावण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका गुजराती विचार मंचातर्फे दाखल करण्यात आली आहे.

सदर याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी याचिकाकर्त्यांला 1 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिले आहे.

मुंबई विमानतळावर मराठीत नाम फलक लावण्यात यावे याकरीता गुजराती विचार मंचने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी झाली.

काय आहे याचिकेत?

सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक आणि दिशादर्शक हे इंग्रजी, हिंदीसह स्थानिक भाषेमध्येही असावेत असे परिपत्रक केंद्रीय गृह विभागाने काढले आहे. म्हणून विमानतळसारख्या सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक आणि दिशादर्शक इंग्रजीसोबतच मराठी आणि देवनागरी भाषेत असायला हवेत.

मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे गुजराती मंचच्या वतीने विनंती करण्यात आली. त्यानंतर या विनंतीची आठवणही करुन देण्यात आली. तरीही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

मुंबई उच्च न्यायालयानेच या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. बोलीभाषा ही प्रत्येक भारतीय नागरिकाचा भावनिक विषय आहे आणि बोली भाषा हा आत्मसन्मान असतो.

आम्ही महाराष्ट्रातील बोली भाषेचा वापर सर्वत्र व्हावा असा आग्रह करत आहोत. मुंबई विमानतळावरील माहिती फलक आणि दिशादर्शक केवळ इंग्रजी भाषेतून असणे हे अत्यंत चुकीचे आहे.

यामुळे स्थानिक भाषिकांची गैरसोय होत असल्याचा निदर्शनात येत आहे. जर मुंबई विमानतळावर इंग्रजीसोबतच मराठी भाषेतून माहिती फलक दिशादर्शक असल्यास मराठी भाषिकांसाठी तो सोयीचा राहणार आहे.

मराठी भाषिकांना विमानतळावर योग्य ठिकाणी जाण्यासाठी कोणाकडे विचारपूस करावी लागणार नाही, असा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गुजराती मंचने न्यायालयात एक लाख रुपये अमानत रक्कम भरल्यास मराठीचा आग्रह धरणाऱ्या याचिकेवर सुनावणी होऊ शकणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.