AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरारमध्ये गावगुंडांचा हैदोस, तिघांना बेदम मारहाण करत गाडीच्या काचा फोडल्या

विरार पूर्व फुलपाडा परिसरात पाच गुंडानी हैदोस घालत तीन जणांना लोखंडी रॉड, लाकडी, दांडे, दगडाने बेदम मारहाण करून, वॅग्नर कारची देखील तोडफोड केली आहे.

विरारमध्ये गावगुंडांचा हैदोस, तिघांना बेदम मारहाण करत गाडीच्या काचा फोडल्या
विरारमध्ये गावगुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 30, 2023 | 7:28 PM
Share

विरार : पुणे नाशिकनंतर आता विरारमध्ये गावगुंडांनी हैदोस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. विरार पूर्व फुलपाडा परिसरात पाच गुंडानी हैदोस घालत तीन जणांना लोखंडी रॉड, लाकडी, दांडे, दगडाने बेदम मारहाण करून, वॅग्नर कारची देखील तोडफोड केली आहे. विरार पूर्वेच्या फुलपाडा रिक्षा स्टॅन्ड पापडखिंडी डॅम येथे काल मध्यरात्री दारूच्या नशेत ही मारहाण केली आहे. मोहित झा, सुमित मिश्रा, राजा चौधरी अशी मारहाण झालेल्या जखमी तरुणांची नावे असून, मोहित झा याच्या मानेला, हाताला, पाठीवर, डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी फरार आहेत.

वारंवार तक्रार करुनही पोलिसांचे दुर्लक्ष

वारंवार तक्रार करून देखील पोलीस या गुंडांवर काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप जखमींनी केला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावगुंडांकडून नेहमीच सामान्य नागरिकांना त्रास

फुलपाडा पापडखिंडी डॅम परिसरात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. मात्र त्याठिकाणी गुंडांकडून नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे. रस्त्याने येणारे जाणाऱ्या महिलांची छेड काढणे, परिसरातील लोकांना धमकावून दहशत पसरवण्याचे काम या गुंडांकडून होत आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यामुळे नागरिक, विशेषतः महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून विरार पूर्व पापरखिंडी डॅम परिसरात बिट चौकी उभारण्यात यावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच