AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupal Ogrey : फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृतदेह, बंद मोबाईल आणि… 2 तासाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून एअर होस्टेसच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. त्यामुळे संपूर्ण मुंबईतच हादरून गेली. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी आठ पथकं तयार केली. अनेकांची चौकशी केली. त्यानंतर व्हिजीटर बूक तपासले. काय घडलं होतं असं...?

Rupal Ogrey : फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृतदेह, बंद मोबाईल आणि... 2 तासाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून एअर होस्टेसच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा
Rupal Murder Case Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2023 | 10:20 AM
Share

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : मुंबईतील मरोळमध्ये एका ट्रेनी एअर होस्टेसची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आकाशात उडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या एअर होस्टेसचं स्वप्न कायमचं भंगलं. तेही क्षुल्लक कारणावरून. एका माथेफिरू व्यक्तीशी भांडण झालं अन् होत्याचं नव्हतं झालं. या तरुणीने अचानक रविवारपासून फोन उचलणं बंद केलं. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांच्या काळजात धस्स झालं. त्यांनी मुंबईतील ओळखीच्या लोकांना मुलीची माहिती घेण्यास सांगितलं आणि त्यानंतर जे उघड झालं त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यांची लाडकी लेक त्यांच्यात नव्हती.

मुंबईचा अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसर. मरोळमधील एनर्जी को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी नेहमीप्रमाणे नॉर्मल होती. मात्र, रविवारी 4 ऑगस्ट रोजी या सोसायटीत एकच खळबळ उडाली. रात्री 10 वाजेच्या सुमारास या सोसायटीत प्रचंड गर्दी झाली. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्या सोसायट्यांमध्ये येऊन पडल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

दरवाजा बंद पण…

सोसायटीतील एका फ्लॅटचा दरवाजा बंद होता. अनेकवेळा बेल वाजवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये मुलगी राहत होती. तिचा फोन वाजत होता. पण उचलला जात नव्हता. त्यामुळे या मुलीच्या बाबत काय झालं असेल? असा सवाल केला जात होता.

म्हणून टेन्शन वाढलं

या फ्लॅटमध्ये छत्तीसगडची 23 वर्षीय तरुणी रुपल ओगरे भाड्याने राहत होती. ती ट्रेनी एअर होस्टेस होती. तिच्या एका नातेवाईकासोबत ती या फ्लॅटमध्ये राहत होती. मात्र, तिची नातेवाईक छत्तीसगडला आली होती. रुपल फ्लॅटमध्ये एकटीच होती. त्यामुळे ती फोन उचलत नसल्याने तिचे कुटुंबीय टेन्शनमध्ये आले होते.

ते सवाल

रुपलसोबत राहणारी तिची नातेवाईक ऐश्वर्याने तिच्या एका मित्राला सोसायटीत पाठवलं. हा नातेवाईक सोसायटीत पोहोचला. कोणीच दरवाजा उघडत नसल्याने त्याने चावी बनवणाऱ्याला बोलावून ड्युप्लिकेट चावी बनवली आणि फ्लॅट उघडला. आतमध्ये पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. फ्लॅटमध्ये ठिकठिकाणी रक्त सांडलेलं होतं. बाथरूममध्ये रुपलचा मृतदेह पडलेला होता. मात्र, बंद फ्लॅटमध्ये रुपलचा खून कसा झाला? कोणी खून केला? आरोपी बंद फ्लॅटमधून पळून कसा गेला? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला.

सीसीटीव्ही फुटेज काय सांगते?

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तपास सुरू केला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आठ पथके तयार केली. प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान रुपलची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीचं व्हिजिटर बूक तपासण्यास सुरुवात केली. नंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या सीसीीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही दिसलं आणि आरोपी पकडला गेला.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.