Mumbai Murder : कांदिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, सहा आरोपींना अटक

मयत दीपक राजभर हा बिहारी टेकडी पोईसर येथील रहिवासी असून त्याचे दहा दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मारहाणही केली होती.

Mumbai Murder : कांदिवलीत जुन्या वादातून तरुणाची हत्या, सहा आरोपींना अटक
कांदिवलीत जु्न्या वादातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:18 PM

मुंबई : जुन्या वादातून धारदार हत्याराने वार करुन एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना कांदिवली पूर्वेतील पोईसरमध्ये ही घटना घडली आहे. दीपक राजभर (30) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या पोलिसांनी सहा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. जुन्या वादा (Old Dispute)च्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती कळते. आरोपी आणि मयत तरुण एकमेकांना ओळखतात. दरम्यान, आरोपी आणि मयतामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरुन वाद झाला होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून तरुणाची हत्या

मयत दीपक राजभर हा बिहारी टेकडी पोईसर येथील रहिवासी असून त्याचे दहा दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मारहाणही केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र हे भांडण कोणत्या कारणावरुन झाले होते हे अद्याप कळू शकले नाही. याचाच राग मनात धरुन आरोपींनी धारदार हत्याराने वार करुन दीपकची हत्या केली. समतानगर पोलिसांना 25 जुलै रोजी परिसरात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेहाच्या अंगावर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता हा मृतदेह बिहारी टेकडी परिसरात राहणाऱ्या दीपक राजभरचा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. तपासाअंती दीपकच्या ओळखीतील व्यक्तींनीची त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केला असता पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सध्या पोलीस सर्व संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. (Youth killed due to old dispute in Kandivali, six accused arrested)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.