AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Theft : पायधुनीतील चोरी प्रकरणी चार आरोपींना अटक, आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत

आरोपींकडून चोरी केलेला 502 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 328 ग्रॅम सोन्याचे बिस्किटे असा एकूण 830 ग्रॅम वजनाचा 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Mumbai Theft : पायधुनीतील चोरी प्रकरणी चार आरोपींना अटक, आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत
पायधुनीतील चोरी प्रकरणी चार आरोपींना अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 5:55 PM
Share

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात भररस्त्यात झालेल्या सोने चोरी (Theft) प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी राजस्थानच्या जालोरमधून अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींनी 23 जुलै रोजी एका सोने व्यापाऱ्याच्या नोकराकडील 890 ग्रॅम वजनाचे 44 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने (Gold) हिसकावून पळ काढला होता. गणेश असे लुटण्यात आलेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी सदर व्यापाऱ्याकडून पायधुनी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. फिर्यादीनुसार 24 जुलै रोजी कलम 392, 34 अन्वये गुन्हा नोंद करत तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी 48 तासाच्या आत राजस्थानमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत राजस्थानातून आरोपींची गठडी वळली

गणेश हा 23 जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास 890 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पायधुनी परिसरातील धोबी स्ट्रिट परिसरातून पायी जात होता. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या चार आरोपींनी त्याच्याकडील सोने हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि चौकशीअंती हे चौघे आरोपी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील राणीवाडा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना होत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरी केलेला 502 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 328 ग्रॅम सोन्याचे बिस्किटे असा एकूण 830 ग्रॅम वजनाचा 95 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

सदर आरोपींना जालोर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजुर केला होता. यानंतर आरोपींना मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. शिवडी न्यायालयाने चौघाही आरोपींना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पायधुनी पोलीस करत आहेत. (Four accused arrested from Rajasthan in case of gold theft from Pyadhuni in Mumbai)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.