AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅड टच, अश्लील इशारे.. मुंबईतल्या 12 वर्षीय मुलीने रेकॉर्ड केलं 65 वर्षांच्या वृद्धाचं कृत्य; पोलिसांकडून अटक

मुंबईतील करी रोड परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका 65 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित मुलीने धाडस करून त्या घटनेचा व्हिडीओ बनवला. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

बॅड टच, अश्लील इशारे.. मुंबईतल्या 12 वर्षीय मुलीने रेकॉर्ड केलं 65 वर्षांच्या वृद्धाचं कृत्य; पोलिसांकडून अटक
AI PicImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2025 | 12:58 PM
Share

मध्य मुंबईतील करी रोड परिसरातील धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित वृद्धावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने धाडस दाखवत त्या व्यक्तीच्या कृत्याला मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं. तो व्हिडीओ तिने तिच्या आईला दाखवला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुलीच्या पालकांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी मंगळवारी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या माजी पोस्ट कर्मचाऱ्याला अटक केली. एफआयआरनुसार, आरोपी मे महिन्यापासून हे कृत्य करत होता. एके दिवशी पीडित मुलगी इमारतीतील दुसऱ्या मजल्याच्या कॉमन कॉरिडोरमध्ये उभी होती. तेव्हा आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील इशारे केले. इतकंच नव्हे तर जेव्हा ती मुलगी तिच्या शेजारच्यांच्या घरी ट्युशनसाठी गेली, तेव्हा तिथेसुद्धा आरोपी आला होता. त्याने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

पुन्हा जेव्हा आरोपीकडून हेच कृत्य झालं, त्याने अश्लील इशारे केले, तेव्हा मुलीने मोबाइलवर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हाच व्हिडीओ तिने आईला दाखवला. त्यानंतर आई-वडिलांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 74 आणि 79 आणि लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण (पॉक्सो) अधिनियमाअंतर्गत कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.