बेकायदेशीर लॉटरी आणि सट्टेबाजांवर मुंबई पोलिसांची छापेमारी, रोख रक्कम आणि साहित्यासह मोठा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने घाटकोपरमधील कॅनास्टा स्किल गेम, प्ले 2 विन नावाच्या चार दुकानांवर छापा टाकला. ही सर्व दुकाने अवैधरित्या कुठल्याही परवान्याविना चालवण्यात येत होती.

बेकायदेशीर लॉटरी आणि सट्टेबाजांवर मुंबई पोलिसांची छापेमारी, रोख रक्कम आणि साहित्यासह मोठा मुद्देमाल जप्त
मुंबई पोलिसांची बेकायदेशी लॉटरी आणि सट्टेबाजांवर कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 8:51 PM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बुधवारी बेकायदेशीर लॉटरी (Illegal Lottery) आणि सट्टेबाजांवर मोठी कारवाई केलीय. गुन्हे शाखेनं (Crime Branch) छापेमारी करत 2 जणांना अटक केलीय तर 10 लोकांना ताब्यात घेतलं आहे, तसंच रोख रक्कम आणि इतर साहित्यही जप्त केलं आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने घाटकोपरमधील (Ghatkopar) कॅनास्टा स्किल गेम, प्ले 2 विन नावाच्या चार दुकानांवर छापा टाकला. ही सर्व दुकाने अवैधरित्या कुठल्याही परवान्याविना चालवण्यात येत होती. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बालाजी विन गेम, जी-सी लॉटरी, ऑनलाईन स्किल लॉटरी, डॉट 11 लॉटरी ह्या लॉटऱ्या अवैधरित्या चालत असल्याचं समजत असून यांच्यावरही पोलीसांची करडी नजर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ओम ऑटो पार्ट, खैरानी रोड, साकीनाका येथे लॉटरी शॉपवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी GC – 1 नावाची बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी चालवली. शासनाचे कोणतेही कायदेशीर परवाने न घेता GC-1 सॉफ्टवेअरवर अज्ञात ठिकाणी सर्वर नियंत्रण कक्ष तयार केले. त्या ठिकाणाहून प्रत्येकी 15 मिनिटांनी लॉटरीचे निकाल इंटरनेटद्वारे प्रसारित करुन स्वत:च्या फायद्यासाठी ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून जुगार खेळवून आरोपींना शासनाची आणि लोकांची फसवणूक आणि नुकसान केले. यावरुन साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

जप्त मुद्देमाल खालीप्रमाणे

1) Lenova कंपनीचा मॉनिटर 2) Lenovo कंपनीचा all in one computer 3) EPSON प्रिंटर 4) प्रिंटिंग रोल 15 नग 5) सिटीजन कंपनीचा कॅल्क्युलेटर 6) Honeywell बारकोड स्कॅनर 7) Dell कंपनीचे दोन कीबोर्ड 8) Lenova कंपनीचे 2 माऊस 9) Netgear कंपनीचा वायफाय 10) ऑनलाइन लॉटरी निकालाचे 15 चार्ट 11) GC-1 ऑनलाइन लॉटरी लावल्याच्या कुपन प्रिंट्स 12) G PAY चे 2 स्कॅनर 13) भारत PAY चे 2 स्कॅनर 14) आरोपींचे 2 मोबाईल

कारवाईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

या कारवाईत सह पोलीस आयुक्त गुन्हे सुहास वारके, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त गुन्हे बालसिंह राजपूत यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नामदेव शिंदे गुन्हे आणि पोलीस निरीक्षक सोपान काकड, पीआय निर्सग ओतरी, एपीआय प्रकाश लिंगे, पोलीस अंमलदार रविंद्र देवार्डे, सुहास कांबळे, युवराज देशमुख, गिरीष मोरे, अनिकेत मोरे, येलप्पा तांबडे या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.