AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 57 व्या वर्षी ‘इंटरेस्टेड इन Video सेक्स’ मेसेजला रिप्लाय करण खूपच महाग पडलं, मुंबईतील घटना

.मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला याचा धक्कादायक अनुभव आला. वांद्रे पश्चिमेला रहाणाऱ्या एका 57 वर्षीय व्यक्तीला 11 जून रोजी व्हॉट्स एपवर मेसेज आला.

वयाच्या 57 व्या वर्षी 'इंटरेस्टेड इन Video सेक्स' मेसेजला रिप्लाय करण खूपच महाग पडलं, मुंबईतील घटना
ट्राय (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Jun 17, 2022 | 10:00 PM
Share

मुंबई: अलीकडे सेक्सटॉर्शनचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. यात ब्लॅकमेलिंग (Blackmailing) करुन पैसे उकळले जातात. मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला याचा धक्कादायक अनुभव आला. या व्यक्तीची सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लूट करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल 2.06 लाख रुपये उकळण्यात आले. समोरुन फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्ली सायबर क्राइम सेलमधील (Delhi cyber crime cell) अधिकारी असल्याचं सांगितलं. अटक टाळण्यासाठी म्हणून पीडित व्यक्तीने ही रक्कम दिली. त्याचे न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देण्यात येत होती. वांद्रे पोलिसांनी (Bandra police) अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. फोन करणाऱ्याने विक्रम राठोड अशी स्वत:ची ओळख सांगितली होती. दिल्ली पोलीस दलात काम करत असल्याचा त्याने दावा केला होता. 2.06 लाख उकळल्यानंतर राठोड सतत धमकी देत होता व जास्त पैशांची मागणी करत होता.

व्हिडिओ सेक्स मध्ये इंटरेस्ट आहे का?

वांद्रे पश्चिमेला रहाणाऱ्या एका 57 वर्षीय व्यक्तीला 11 जून रोजी व्हॉट्स एपवर मेसेज आला. व्हिडिओ सेक्स मध्ये इंटरेस्ट आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावर त्याने येस असा रिप्लाय केला. त्यानंतर त्याच्या मोबाइलवर फोन आला. समोरुन बोलणाऱ्या महिलेने त्या व्यक्तीला विवस्त्र होण्यास सांगितलं. तो लगेच तयार झाला. त्यानंतर त्याला धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली. त्याच्या बहिणीला, कुटुंबियांना या न्यूड व्हिडिओबद्दल सांगू, अशी धमकी त्याला देण्यात आली.

ती महिला सुद्धा विवस्त्र होती

व्हिडिओ कॉल करणारी महिला सुद्धा विवस्त्र होती. पण तिने तिचा चेहरा दाखवला नाही, असं पीडित तक्रारदाराने सांगितलं. हे सर्व सुरु असताना अचानक कॉल कट झाला व त्याला दुसरा कॉल आला. त्यात महिलेने त्याला धमकावले. तुझा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला असून 81 हजार रुपये दिले नाही, तर सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

व्हिडिओ डिलिट करण्यासाठी रणवीर गुप्ताला कॉन्टॅक्ट कर

दोन दिवसानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्ली सायबर क्राइम विभागात काम करत असून प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. अटक टाळून व्हिडिओ डिलिट करायचे असतील, तर रणवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीला संपर्क करण्यास सांगितलं. त्याने गुप्ताला फोन केला त्याने 51 हजार रुपयांची मागणी केली. आरोपींकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने अखेर त्याने पोलीसात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?