AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली, अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार, व्हिडीओही रेकॉर्ड

आजकाल लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल असतोच. सोशल मीडियाचा वापरही बहुसंख्य लोक करतात. इन्स्टाग्राम, फेसबूक अशा ॲप्सच्या माध्यमातून नवनवीन लोकाशी ओळख होते, प्रसंगी मैत्रीही केली जाते. मात्र सोशल मीडियाचा हाच वापर धोकादायकही ठरू शकतो

इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली, अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार, व्हिडीओही रेकॉर्ड
| Updated on: Jan 22, 2025 | 9:01 AM
Share

आजकाल लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल असतोच. सोशल मीडियाचा वापरही बहुसंख्य लोक करतात. इन्स्टाग्राम, फेसबूक अशा ॲप्सच्या माध्यमातून नवनवीन लोकाशी ओळख होते, प्रसंगी मैत्रीही केली जाते. मात्र सोशल मीडियाचा हाच वापर धोकादायकही ठरू शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील दहिसर येथे घडला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या मित्राने एका मुलीवर अत्याचार केला, तसेच तिची अश्लील छायाचित्र काढल्याचेही उघडकीस आले. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडित मुलीला धमकावून तिचे अश्लील छायाचित्र ओळखीच्या व्यक्तींनाही पाठवले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघी 17 वर्षांची असून 2022 साली तिची ओळख इन्स्टाग्रामवरून 23 वर्षांच्या आरोपी मुलाशी झाली. हळहूळ ते बोलू लागले, मैत्री झाली आणि बघता बघता त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने एक दिवस तिला स्वतःच्या व मित्राच्या घरी बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला. हा घृणास्पद प्रकार तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता तर त्यानंतर त्या मुलाने या घाणेरड्या कृत्यानंतर पीडित मुलीच्या नकळत त्यांचे चित्रीकरण केले.

पुढे वेळोवेळी तो तिला बोलावत राहिला पण त्या पीडित मुलीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला. तेव्हा संतापलेल्या आरोपीने त्या मुलीचे छायाचित्र तिचे नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. एवढंच नव्हे तर तसेच इन्स्टाग्रामवरही पीडित मुलीचे छायाचित्र अपलोड केले होते. या संपूर्ण प्रकारामुळे मुलगी तणावाखाली होती. अखेर एक परिचीत व्यक्तीने तिला धीर देऊन पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्या मुलीने कशीबशी हिंमत गोळा केली आणि दहिसर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संपूर्ण प्रकार कथ करतल आरोपी मुलाविरोधात तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे, मात्र पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.