AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai crime : आधी शाळेत शिकवायची, मग 5 स्टार हॉटेलमध्ये कपडे उतरवायची ! प्रतिष्ठित शाळेच्या शिक्षिकेचं घृणास्पद कृत्य

Mumbai crime : देशातील टॉप पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील अतिशय प्रतिष्ठत शाळेतील एका शिक्षिकेवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने अल्पवयीन विद्यार्थ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्यावर अत्याचार केल्याचा आणि त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. असून तिला अटक करण्यात आली आहे.

Mumbai crime : आधी शाळेत शिकवायची, मग 5 स्टार हॉटेलमध्ये कपडे उतरवायची ! प्रतिष्ठित शाळेच्या शिक्षिकेचं घृणास्पद कृत्य
शिक्षिकेच्या अश्लील कृत्याने हादरली मुंबईImage Credit source: social media
| Updated on: Jul 02, 2025 | 12:10 PM
Share

शिक्षकांना, गुरूंना आपल्याकडे देवाचा दर्जा देण्यात येतो. त्यांना देवासमान मानून कित्येक जण त्यांची पूजा करतात, आशिर्वाद घेतात. पण शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका महिला शिक्षिकेने अतिशय भयानक कृत्य केल्याची, सर्व शिक्षकांना शरमेने मान खाली घालायला लागेल असे वागल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली आहे. प्रत्येक पालक हे आपल्या मुलांना खूप विश्वासाने शाळेत पाठवतात, शिक्षकांवर त्यांचा अतोनात विश्वास असतो. मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने जे कृत्य केलं त्यामुळे शिक्षकच भक्षक बनल्याची चर्चा आहे. देशातील टॉप पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील एका शाळेतील शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यावर अत्याचार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेला बेड्या ठोकून अटक केली आहे. ती महिला शिक्षिका गेल्या वर्षभरापासून त्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती असा आरोप आहे. आणि ही अत्यंत अश्लील घटना कोणत्याही सुनसान जागी नव्हे तर शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडत होती. हा भयाक , किळसवाणा प्रकार उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. दादर पोलिसांनी त्या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि फौजदारी संहितेच्या इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व कायदे मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणला आणि त्याला इतके दिवस गप्प बसवले. एवढंच नव्हे तर ती त्याला मद्य द्याचीच तसेच नैराश्याविरोधी औषधे देत असे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमकुवत होत होती. तो भीतीच्या सावटाखाली आणि संकोचून जगत होता. तसेच आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता.

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये करायची अश्लील कृत्य

हैराण करणारी बाब म्हणजे आरोपी शिक्षिकेने हे घृणास्पद कृत्य एकदा-दोनदा नाही तर अनेक वेळा केले आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी शिक्षिका ही शालेत शिकवायची. त्यानंतर ती पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची आणि त्याच्यावर अत्याचार करत लैंगिक शोषण करायची. तिने हे सर्व कृत्य अत्यंत हुशारीने आणि विचारपूर्वक केले होते.

परीक्षेनंतर अखेर विद्यार्थ्याचा बांध फुटला

अखेर बराच काळ सगळं सहन केल्यानंतर, अखेर त्या विद्यार्थ्याने बारावीची (12वी बोर्ड) परीक्षा दिली आणि त्याने तिच्या पालकांना संपूर्ण सत्य सांगितले. त्या शिक्षिकेने त्याला एका नोकराद्वारे बोलावले आणि नंतर अनेक वेळा लैंगिक शोषण कसे केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला.

हे ऐकून त्या विद्यार्थ्याचे आई-वडील हादरलेच. पण त्यांनी हिंमत दाखवली आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा चंग बांधत पोलिसांत धाव घेतली. सर्व प्रकार सांगत त्यांनी न घाबरता त्या शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. अखेर दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.