हिंदू प्रियकरासाठी मुस्लीम नवरा सोडला, धर्म बदलून सायमीनची झाली श्रुती; नेमकं प्रकरण काय?
मला मुस्लिम धर्म आवडत नाही; असे एका तरुणीने म्हटले आहे. तिने हिंदू प्रियकरासाठी झालेला निकाह मोडला. तसेच लग्नानंतर नाव बदलून श्रुती असे ठेवले आहे. आत नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील एका मुस्लिम मुलीने हिंदू धर्म स्वीकारला आणि एका हिंदू तरुणाशी लग्न केले. मुलीने सांगितले की, ती गेल्या चार वर्षांपासून एका हिंदू तरुणावर प्रेम करते. जेव्हा ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळली, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी गेल्या वर्षी तिचे जबरदस्तीने दुसऱ्या मुस्लिम तरुणाशी लग्न लावून दिले. पण आता ती मुलगी आपल्या नवऱ्याला सोडून आपल्या प्रियकराकडे परतली आणि हिंदू रिती-रिवाजांनुसार त्याच्याशी लग्न केले.
खरं तर, बुलंदशहरच्या खुर्जा येथे एका प्रेमी जोडप्याने हिंदू रिती-रिवाजांनुसार लग्न केले. जे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. मुलीचे नाव सायमीन आहे, जी मुरादाबादची रहिवासी आहे. सायमीन गेल्या चार वर्षांपासून रूपेंद्र उर्फ गोलू याच्यावर प्रेम करते. गेल्या वर्षी दोघेही घर सोडून एकत्र पळून गेले होते. पण सायमीनच्या कुटुंबीयांनी त्यांना पकडले होते.
सायमीनने स्वीकारला सनातन धर्म
यानंतर सायमीनचे लग्न दिल्लीतील सैफ नावाच्या व्यक्तीशी लावून देण्यात आले, जो एका पायाने अपंग आहे. सैफशी लग्नानंतर सायमीनने एका मुलाला जन्म दिला. पण आता ती आपला नवरा आणि मुलगा दोघांनाही सोडून आपल्या पहिल्या प्रेमाकडे परतली आणि रूपेंद्रसोबत लग्न केले आहे. रूपेंद्र आणि सायमीनने खुर्जा येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि याचवेळी सायमीनने सनातन धर्म स्वीकारला.
सायमीन बनली श्रुती
सायमीनने आपले नावही बदलले आहे. सायमीन आता श्रुती बनली आहे. तिने सांगितले की, ज्या व्यक्तीशी माझ्या घरच्यांनी माझे लग्न लावले, तो मला मारहाण करायचा. मला हिंदू धर्म आवडतो. मला मुस्लिम धर्म आवडत नाही, कारण त्यात मारहाण होते आणि तलाक देऊन चार-चार बायका ठेवल्या जातात. मला हिंदू रिती-रिवाज आवडतात आणि म्हणूनच मी रूपेंद्रवर प्रेम केले आणि आता त्याच्याशी लग्नही केले. आता मी रूपेंद्रसोबतच राहू इच्छिते. रूपेंद्रने सांगितले की, त्यांनी आर्य समाजात लग्न केले आहे. पण आता सायमीनच्या नातेवाइकांकडून आणि गावकऱ्यांकडून त्यांना जीव मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
