तक्रारदार तरुणीची साक्ष विश्वासार्ह नाही, नागपूर खंडपीठाकडून बलात्काराच्या आरोपीची सात वर्षांनी मुक्तता

पीडितेच्या साक्षीशिवाय तिच्या तक्रारीवर विश्वास ठेवण्यासारखा दुसरा कुठलाही भक्कम पुरावा नाही, असं नागपूर खंडपीठाने सांगितलं (Nagpur rape victim trust)

तक्रारदार तरुणीची साक्ष विश्वासार्ह नाही, नागपूर खंडपीठाकडून बलात्काराच्या आरोपीची सात वर्षांनी मुक्तता
प्रातिनिधीक फोटो

नागपूर : बलात्कार पीडितेच्या जबाबावर विश्वास ठेवण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्काराच्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीविरोधात बलात्कार पीडितेने दिलेली साक्ष पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याचं सांगत जज पुष्पा गनेदीवाला यांनी आरोपीची सुटका केली. (Nagpur bench rape victim testimony insufficient for trust accused acquits)

तक्रारदार तरुणीकडे पुराव्याचा अभाव

सुरुवातीच्या तक्रारीत बलात्काराचा आरोप का केला नाही, याविषयी पीडिता कुठलेही स्पष्टीकरण देऊ शकली नाही. पीडितेच्या साक्षीशिवाय तिच्या तक्रारीवर विश्वास ठेवण्यासारखा दुसरा कुठलाही भक्कम पुरावा नाही, असं नागपूर खंडपीठाने सांगितलं. गडचिरोलीचे याचिकाकर्ते बिनॉय बादल दत्ता यांना कलम 376 आणि 323 अन्वये दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर 14 डिसेंबर 2015 रोजी सेशन्स कोर्टाने त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

पतीच्या मित्रावर बलात्काराचा आरोप

3 फेब्रुवारी 2014 रोजी ही घटना घडल्याचा दावा तक्रारदार तरुणीने केला आहे. 21 वर्षीय विवाहिता त्यावेळी आपल्या घरात एकटीच होती. 26 वर्षीय आरोपी तिच्या पतीचा मित्र असून दोघांची ओळख होती. तरुणीच्या दाव्यानुसार ती जेवण बनवत असताना आरोपी दरवाजा ठोठवून स्वयंपाकघरात आला. त्यानंतर त्याने आपले हात मागून बांधले आणि जमिनीवर झोपवले. मग आपले तोंड बंद करुन त्याने कपडे काढले आणि जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तिने एफआयआरमध्ये केला होता.

आधी छेडछाडीची तक्रार, मग बलात्काराची

घडलेला प्रकार तिने आपल्या नवऱ्याला सांगितला. सहा दिवसांनी (9 फेब्रुवारी 2014) त्यांनी गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सुरुवातीला केवळ छेडछाड झाल्याची तक्रार तिने नोंदवली. त्यामुळे कलम 354, 323 आणि 504 अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा पोलिस स्टेशनला गेली आणि आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा केला. त्यामुळे कलम 376 जोडण्यात आले. (Nagpur bench rape victim testimony insufficient for trust accused acquits)

आरोपीचे हायकोर्टात आव्हान

सेशन्स कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर याचिकाकर्त्याने शिक्षेला हायकोर्टात आव्हान दिले. तक्रारदार तरुणीच्या नवऱ्याला संशय होता, की आपण त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केले. त्याच्या सांगण्यावरुनच एफआयआर दाखल करण्यात आला, असं याचिकाकर्त्याने हायकोर्टात सांगितलं.

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

सांगलीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एक आरोपी अटकेत

(Nagpur bench rape victim testimony insufficient for trust accused acquits)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI