एकाच घरात चौघांचे मृतदेह, पती-पत्नी, 2 मुलांच्या आत्महत्येनं नागपूर हादरलं

एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.

एकाच घरात चौघांचे मृतदेह, पती-पत्नी, 2 मुलांच्या आत्महत्येनं नागपूर हादरलं
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 12:49 PM

एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेबद्दल समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.

नेमकं काय घडलं ?

याप्रकणाबाबत पोलिसांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार, नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील धक्कादायक घटना आहे. एकाच घरातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. त्यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विजय पचोरी (वय 68), त्यांची पत्नी मालाबाई पचोरी (वय 55), मुलगा दीपक पचोरी (वय 38) व गणेश पचोरी (वय 38) अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबातील या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.मात्र यामुळे मोवाड गावात भीतीचे वातावरण आहे.

या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिकची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. या कुटुंबाने आयुष्य का संपवले असावे, ही आत्महत्या आहे की हत्या असे बरेच प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्...
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्....
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?.
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु
बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावती रूग्णालयात उपचार सुरु.
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण
'गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय...', ठाकरेंचा सरकारवर निशाण.
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.