नामांकित व्यापाऱ्याच्या नावाने फोन केला अन् बँकेला लाखों रुपयांना गंडा घातला !

वाधवाणी हे शहरातील नामांकित व्यापारी आहेत. त्यांचा याच बँकेतून मोठा व्यवहार होतो. त्यामुळे अर्जेंट असल्याचे सांगितल्याने मॅनेजरने त्यांचं काम केलं.

नामांकित व्यापाऱ्याच्या नावाने फोन केला अन् बँकेला लाखों रुपयांना गंडा घातला !
सायबर गुन्हेगारांचा बँकेला लाखों रुपयांना गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 5:20 PM

नागपूर : नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime)च्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार मोठ्या चलाखीने ऑनलाईन फसवणुकी (Online Fraud)चे धंदे करू लागले आहेत. अशाच एका गुन्ह्यात सायबर गुन्हेगारांनी मोठ्या व्यापाऱ्याचे नाव सांगत बँकेतून तब्बल 41 लाख रुपयांचे व्यवहार करीत बँकेची फसवणूक (Cheating) केली आहे. बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.

वाधवाणी हे शहरातील नामांकित व्यापारी आहेत. त्यांचा याच बँकेतून मोठा व्यवहार होतो. त्यामुळे अर्जेंट असल्याचे सांगितल्याने मॅनेजरने त्यांचं काम केलं. मात्र त्याच बँकेची फसवणूक झाली.

फसवणूक करणारा भामटा फरार; गुन्हा दाखल

ऑनलाईन फसवणूक करणारा भामटा फरार झाला असून त्या अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

2 कोटीची एफडी करण्याची बतावणी केली

शहरातील नामांकित व्यापाऱ्याचं नाव सांगत बँक मॅनेजरला फोन करून 2 करोडची एफडी करायची असल्याचं सांगितलं. मात्र त्याआधी माझ्या खात्यातून काही ट्राजेक्शन करायचं आहे ते करा असे ऑफिसरला सांगत सायबर गुन्हेगाराने थाप मारली.

विविध खात्यात 41 लाख टाकायला सांगितले

आरोपीने व्यापाऱ्याच्या खात्यातून 41 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात टाकायला सांगितलं. बँकेचे जुने आणि मोठे ग्राहक असल्याने मॅनेजरने ट्राजेक्शन करून दिले.

मॅनेजर व्यापाऱ्याच्या कार्यालयात पोहचल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड

व्यापाऱ्याच्या कार्यालयात मॅनेजर पोहचल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की, आम्ही कुठलंही ट्राजेक्शन करायला सांगितलं नाही किंवा एफडी सुद्धा करायची नाही. यावरून फ्रॉड झाल्याचं लक्षात आलं आणि सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

याप्रकरणी बजाज नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. कुठलाही व्यवहार करताना सावध राहून करावा असे आवाहन पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.