AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पित्याचे निर्दयी कृत्य, पोटच्या मुलांसोबत केले ‘हे’ कृत्य, मग…

अशोकचे त्याच्या पत्नीसोबत वाद होते. याच वादाला कंटाळून त्याची पत्नी मुलांसह वेगळी राहत होती. पत्नी नांदायला यायला तयार नव्हती. अखेर समझोत्यानुसार दोन्ही मुलं आठवड्यातून एकदा वडिलांना भेटायला जातील असे ठरले होते.

Nagpur Crime : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पित्याचे निर्दयी कृत्य, पोटच्या मुलांसोबत केले 'हे' कृत्य, मग...
नागपूरमध्ये मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्याImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 16, 2023 | 6:40 PM
Share

नागपूर : पती-पत्नीच्या वादात मुलं नेहमी भरडली जातात. मात्र आई-वडिलांमधील भांडण चक्क मुलांच्या जीवावरच बेतल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. या घटनेत पित्यासह 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर 12 वर्षीय मुलावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अशोक बेले असे आरोपी पित्याचे नाव आहे. याप्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

काय घडले नेमके?

नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैष्णवदेवी नगर येथे अशोक बेले हा पत्नी प्रिया बेले आणि दोन मुलांसह राहत होता. बेले दाम्पत्याला 12 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी होती.

पत्नी मुलांसह वेगळी राहत होती

अशोकचे त्याच्या पत्नीसोबत वाद होते. याच वादाला कंटाळून त्याची पत्नी मुलांसह वेगळी राहत होती. पत्नी नांदायला यायला तयार नव्हती. अखेर समझोत्यानुसार दोन्ही मुलं आठवड्यातून एकदा वडिलांना भेटायला जातील असे ठरले होते.

आजोबांनी मुलांना वडिलांना भेटायला नेले

ठरल्याप्रमाणे काल आजोबांनी दोन्ही मुलांना वडिलांकडे भेटायला सोडले आणि ते निघून गेले. आजोबा सोडून गेल्यानंतर अशोकने दोन्ही मुलांना विष पाजले, त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली.

आजोळचे लोक मुलांना घ्यायला आले असता घटना उघडकीस

मुलांना घेण्यासाठी जेव्हा पत्नीकडील व्यक्ती अशोकच्या घरी आले तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर दोन्ही मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाला होता, तर मुलावर आयसीयुत उपचार सुरु आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच