Nagpur Murder : नागपूर महिला भिकारी हत्या प्रकरण, आरोपीला नाशिकमधून अटक, झोपण्याच्या जागेवरील वादातून हत्या

| Updated on: Aug 23, 2022 | 5:09 PM

हत्येच्या दिवशी पाऊस असल्याने सगळे त्या बिल्डिंगच्या शेडकडे गेले. मात्र त्या ठिकाणी मृतक महिला आधीच झोपली होती. आरोपीने तिला ही माझी जागा आहे तू दुसरीकडे झोप असे सांगितलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.

Nagpur Murder : नागपूर महिला भिकारी हत्या प्रकरण, आरोपीला नाशिकमधून अटक, झोपण्याच्या जागेवरील वादातून हत्या
नागपूर महिला भिकारी हत्या प्रकरण, आरोपीला नाशिकमधून अटक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : नागपूर विधानभवन समोर झालेल्या महिला भिकाऱ्याच्या हत्या (Murder) प्रकरणातील आरोपीला अटक (Arrest) करण्यात पोलिसांना यश आले. झोपण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून आरोपीने महिलेला डोक्यात वार करुन तिची हत्या केली होती. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत त्याआधारे आरोपीचे फोटो नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात पाठवले. फोटोवरुन आरोपीचा शोध घेतला नाशिक रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केले. कौशल कोमलवार असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विधान भवनचा परिसर असल्याने आणि महिलेची हत्या झाल्याने नागपुरात मोठी खळबल उडाली होती.

विधान भवनासमोर इमारतीच्या शेडमध्ये आढळला होता मृतदेह

नागपूरच्या विधानभवन समोर असलेल्या बिल्डिंगच्या शेडमध्ये 24 जुलै रोजी एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. याच परिसरात मिठा निम दर्गा आहे. या ठिकाणी अनेक भिकारी राहतात आणि तिथेच झोपतात. त्यापैकीच एक ही महिला होती. हत्येच्या दिवशी पाऊस असल्याने सगळे त्या बिल्डिंगच्या शेडकडे गेले. मात्र त्या ठिकाणी मृतक महिला आधीच झोपली होती. आरोपीने तिला ही माझी जागा आहे तू दुसरीकडे झोप असे सांगितलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपी कौशल कोमलवार याने तिला मारहाण करत डोक्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला नाशिकमधून अटक

सदर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. मात्र तोपर्यंत तो रेल्वेत बसून नाशिकला पोहचला होता. तो तिथे रेल्वे स्टेशनच्या आसपास नशेडी लोकांसोबत राहत होता. पोलिसांनी त्याचे सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेले फोटो सर्वत्र पोलीस स्टेशनला पाठविले. त्याआधारे नाशिक पोलिसांनी त्याला अटक करून नागगपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं. आरोपीला अटक केल्यानंतर ही हत्या दोन भिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून घडल्याचं समोर आलं. (Accused arrested from Nashik in case of murder of woman in Nagpur)

हे सुद्धा वाचा