Jalgaon Accident: टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार; इच्छापूर-इंदूर महामार्गावर भीषण अपघात

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भरलेल्या अॅटो रिक्षाला आयशर टेंपोने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असून दोन विद्यार्थिनी व रिक्षाचालक जागीच ठार झाले. तर 18 विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Jalgaon Accident: टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार; इच्छापूर-इंदूर महामार्गावर भीषण अपघात
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 2:51 PM

बुऱ्हानपूरः इच्छापूर-इंदूर महामार्गावर (Ichchapur-Indore Highway) शहापूरजवळ आयशर आणि अॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 ठार (3 Student Death) तर 18 जण जखमी (18 Injured) झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आह. या अपघाताची नोंद शाहपूर पोलिसात नोंद झाली असून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुऱ्हाणपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अॅपे रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील मृतांमध्ये दोन विद्यार्थिनींचा समावेश असून जिल्ह्यात भरधाव वेगामुळे अपघात होत असल्याने वाहनांच्या वेगमर्यादेवर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात येत आहे.

बुरऱ्हानपूर जिल्ह्यातील इंदूर इच्छापूर राज्य महामार्गावर वाहनांचा वेगावर मर्यादा नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यत येत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भरलेल्या अॅटो रिक्षाला आयशर टेंपोने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असून दोन विद्यार्थिनी व रिक्षाचालक जागीच ठार झाले. तर 18 विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमी बंबरामधील रहिवासी

अपघातात ठार झालेले आणि जखमी असलेले विद्यार्थी हे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असून ते सर्वजण बुऱ्हाणनपूरच्या दिशेने जात असताना समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींनी रुग्णालयात पाठवण्यात आले असून ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह बुऱ्हानपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

आयशर चालकावर गुन्हा दाखल

अपघातातील सर्व विद्यार्थी बंबरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून उर्वरित गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.