अमरावतीत PSI च्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, 2 पोलीस उपायुक्तांवर गंभीर आरोप, सहायक पोलीस आयुक्ताच्या हातात तपासाचे सूत्रे

पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी आता या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे.

अमरावतीत PSI च्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, 2 पोलीस उपायुक्तांवर गंभीर आरोप, सहायक पोलीस आयुक्ताच्या हातात तपासाचे सूत्रे
अमरावतीत पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 11:50 PM

अमरावती : अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) अनिल मुळे यांनी 13 ऑगस्टला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात अनिल मुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात त्यांनी DCP दर्जाचे दोन अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा जवळपास उलगडा झाला, अशी चर्चा होती. पण या प्रकरणाला आता वेगळे वळण आल्याचं चित्र आहे.

तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने आरोप फेटाळले

पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी आता या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे. मात्र या प्रकरणात 2 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर आरोप असल्याने त्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तपास कसा करणार? हा मुद्दा उपस्थित होत आहे. तसेच सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी दोन्ही डिसीपींवर केलेले आरोप फेटाळले आहेत. त्यांनी मृतक मुळे यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अनेक शिक्षा झाल्याचे सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 ऑगस्टला समोर आली होती. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासह शहरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनिल मुळे यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. खरंतर ती क्लिप ही अनिल मुळे आणि त्यांचे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मित्राची फोनवर संभाषणाची आहे. या संभाषणात ते आपल्यावर वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याचे म्हटलं होतं.

काय आहे ऑडिओ क्लिप

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या मित्राला अनिल मुळे सांगत आहेत, की माझी काही चुकी नसताना मला वरिष्ठांकडून त्रास दिला जात आहे. मला दोन वेळा आपल्या वरिष्ठांनी शिक्षा केली आहे. मी पोलीस कमिश्नर आरती सिंह यांना सुद्धा भेटलो, तरी सुद्धा त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. तर माझी बदली झाली, प्रमोशन होऊन सुद्धा माझं इन्क्रीमेंट रोखलं. माझी पीआय हजर करुन घेत नाही आहे, सीपी ऑफिसला जा म्हणते, तर सीपी ऑफिस पीआयकडे जा, म्हणत आहे. यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अनिल मुळे यांनी आत्महत्या केल्याचं ऑडिओ क्लीपवरुन दिसत आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करत आहेत.

अनिल मुळे यांच्या मित्राचे आरोप

या घटनेचा निष्पक्ष तपास करावा. तसेच अनिल मुळे हे व्यसनाधीन होते. तसेच त्यांचा काही दिवसांपूर्वी एका महिलेसोबत वाद झाला होता. ते प्रकरण पूर्णतः मिटल्यानंतरही अनिल मुळे यांची बदनामी करण्याकरता व्हाट्सअॅपवर काही आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आले, असा आरोप हिंगोली येथे जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांच्या मित्राने केले आहेत.

लिंबाच्या झाडाला गळफास

अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते. जवळपास आठ वर्ष त्यांनी काम केलं होतं. मुळे हे कटोरा नाका, रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घराजवळ गोल्डन लिफ मंगल कार्यालयाच्या समोरील लेआऊटमध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं होतं.

संबंधित बातम्या :

अमरावतीत पोलीस उपनिरिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, विभागात खळबळ

निरोप समारंभ झाला, बदलीनंतर नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी अहमदनगरात पोलिसाचा गळफास

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.