प्रवाशांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकत कारवर सिनेस्टाईल दरोडा, 22 लाख लुटणारे आठ आरोपी गजाआड

धानाचे पैसे व्यापाऱ्याकडून परत घेऊन येत असताना साकोली ते पळसगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास काही जणांनी चारचाकी गाडी थांबवली होती. कारमधील प्रवाशांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला

प्रवाशांच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकत कारवर सिनेस्टाईल दरोडा, 22 लाख लुटणारे आठ आरोपी गजाआड
भंडाऱ्यात कारवर दरोडा, आठ आरोपी अटकेत
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 30, 2021 | 9:30 AM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 22 लाख रुपयांची रोख रक्कम सिने स्टाईल चोरणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार ज्या गाडीवर दरोडा पडला, तिचा चालकच निघाला. चोरी प्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं.

नेमकं काय घडलं?

धानाचे पैसे व्यापाऱ्याकडून परत घेऊन येत असताना साकोली ते पळसगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास काही जणांनी चारचाकी गाडी थांबवली होती. कारमधील प्रवाशांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर बावीस लाख रुपये हिसकावून चोरांनी पळ काढला.

चालकाच्या उत्तरांमध्ये तफावत

तक्रारदाराने साकोली पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. साकोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रं फिरवली. तक्रारदार आणि चालकाची उलटसुलट तपासणी केली असता, चालकाच्या उत्तरांमध्ये तफावत आढळली. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवला असता चालक रामदास भिरकड यांनीच आपल्या मित्राच्या मदतीने ही चोरी घडवून आणली, अशी कबुली दिली. त्यानंतर चोवीस तासाच्या आता रोख रकमेसह आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

विरारमध्ये सशस्त्र दरोडा

दरम्यान, विरारमध्ये गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास आयसीआयसीआय बँकेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. विरार पूर्व स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय बँकेत ही घटना घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला. सोने आणि पैशांची बॅग घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जो दरोडेखोर पकडला गेला, तो याच बँकेत पूर्वी मॅनेजर म्हणून काम करत असल्याचीही माहिती आहे.

संबंधित बातम्या :

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

मुथूट दरोडा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 12 तासांत पाच आरोपींना अटक

(Bhandara Cine Style Robbery on Car Eight Accuse arrested within 24 hours)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें