किराणा दुकानासमोरुन 200 लिटर तेलाचे तीन बॅरल चोरीला, बुलडाण्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं

बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या आहेत. आता तर चोरट्यांनी हद्द केली.

किराणा दुकानासमोरुन 200 लिटर तेलाचे तीन बॅरल चोरीला, बुलडाण्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं
बुलडाण्यात तेल चोरी

बुलडाणा : किराणा दुकानाच्या समोर असलेल्या खाद्य तेलाच्या 200 लिटरच्या तीन बॅरल चोरट्यांनी चोरल्या. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात हा प्रकार घडला. पोलीस तपास सुरु असून अद्याप चोराचा शोध लागला नाही.

नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या आहेत. आता तर चोरट्यांनी हद्द केली. मोताळा शहरातील आठवडी बाजारातील एम के ट्रेडर्स या होलसेल किराणा दुकानाच्या समोर असलेल्या दोनशे लिटरच्या तीन खाद्यतेलाच्या बॅरल रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांविषयी संताप

यासंदर्भात एम के ट्रेडर्सच्या मालकानी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून चोरट्यांचा तपास सुरु केला आहे. तर बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोताळा शहरांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

यापूर्वी कैलास झंवर यांच्या दुकाना समोरील एक 200 लिटरची खाद्य तेलाची बॅरल चोरीला गेल्याची घटना घडली होती, मात्र त्या चोरट्याचा सुद्धा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

संबंधित बातम्या :

घरगुती सिलिंडरमधून अडीच किलो गॅसची चोरी, 43 गॅसच्या टाक्या जप्त, 3 आरोपींना अटक

आधी गोड बोलून निर्जन स्थळी नेले, नंतर चाकूचा धाक दाखवत पैशांची लूट, 2 तरुणांना अवघ्या 18 तासांत बेड्या

(Buldana Motala 200 liter three Oil barrel stolen)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI