AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती सिलिंडरमधून अडीच किलो गॅसची चोरी, 43 गॅसच्या टाक्या जप्त, 3 आरोपींना अटक

ग्राहकांना घरपोच दिल्या जाणार्‍या गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याऱ्या टोळीला अटक करण्यात आलीये.

घरगुती सिलिंडरमधून अडीच किलो गॅसची चोरी, 43 गॅसच्या टाक्या जप्त, 3 आरोपींना अटक
ahmednagar gas crime
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 11:16 PM
Share

अहमदनगर : ग्राहकांना घरपोच दिल्या जाणार्‍या गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याऱ्या टोळीला अटक करण्यात आलीये. व्यावसायिक वापरासाठीच्या गॅसच्या टाक्या ठिकाणी भरल्या जात होत्या, तेथे तोफखाना पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये एकूण 43 गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या असून तीन आरोपींना अटक करण्यात आलीये. (Gang arrested for stealing gas from gas tank in Ahmednagar)

घरगुती गॅस सिलिंडरमधून दोन ते अडीच किलो गॅसची चोरी

मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक घरगुती गॅस सिलिंडरमधून दोन ते अडीच किलो गॅसची चोरी केली जात होती. घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये भरला जात होता. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे ठरवले. त्यानुसार पोलिसांनी आपली योजना आखली.

रॅकेट सक्रिय असलेल्या ठिकाणी धडक कारवाई 

गॅस चोरीची ही गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी रॅकेट सक्रिय असलेल्या ठिकाणी धडक कारवाई केली. याप्रकरणी भगवानराम गिरधरीराम बिष्णोई, (वय 23 जोधपूर राजस्थान) भजनलाल जगदीश बिष्णोई, (राहणार राजस्थान) यांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅस चोरी करणाऱ्या अशा रॅकेटचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली असून गॅस चोरी करणाऱ्या अशा रॅकेटचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

आधी गोड बोलून निर्जन स्थळी नेले, नंतर चाकूचा धाक दाखवत पैशांची लूट, 2 तरुणांना अवघ्या 18 तासांत बेड्या

चाकू, तलवारी, रायफल, अन् बंदुका, अवैध शस्त्रांचं मोठं घबाड, भुसावळमध्ये पोलिसांची धडक कारवाई

आधी गळा आवळला नंतर पोत्यात भरलं, प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी तिनं पतीला संपवलं, चंद्रपूर हादरलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.