तुमच्या गल्लीत गुंडांची दादागिरी? घाबरु नका, नाव गुप्त ठेवू, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही

पोलिसांची नकारात्मक छवी सुधारण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्ताचा विश्वास देण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक नवी मोहिम सुरु केली आहे (complain without hesitation Nagpur police new campaign).

तुमच्या गल्लीत गुंडांची दादागिरी? घाबरु नका, नाव गुप्त ठेवू, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही
तुमच्या गल्लीत गुंडांची दादागिरी? घाबरु नका, नाव गुप्त ठेवू, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही
सुनील ढगे

| Edited By: चेतन पाटील

Jun 20, 2021 | 11:19 PM

नागपूर : नागपूरमध्ये प्रचंड गुन्हेगारीच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण असतं. अनेकजण गुंडांच्या दहशतीला घाबरुन पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी देखील जात नाहीत. तक्रार नसल्यामुळे त्या गुंडांची माहिती पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचत नाही. गुंड काहितरी मोठं गैरकृत्य करतात. त्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आधी गुंडांच्या दहशतीतून बाहेर काढणं, त्यांना भयमुक्त करणं ही पोलिसांची पहिली जबाबदारी आहे. याशिवाय काही नागरिकांचा हल्ली पोलिसांवरीलही विश्वास उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोलिसांची नकारात्मक छवी सुधारण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्ताचा विश्वास देण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक नवी मोहिम सुरु केली आहे (complain without hesitation Nagpur police new campaign).

पोलिसांची नवी मोहिम नेमकी काय?

गुन्हेगारांना घाबरुन नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करु शकत नाहीत. याशिवाय शहरातील गुन्हेगारी संदर्भात नागरिकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मात्र, नागरिक पोलीस स्टेशनला जावं लागेल यासाठी टाळाटाळ करतात आणि तक्रार करत नाहीत. त्यामुळे यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. आता नागपूरकर घरातूनच व्हाट्सअ‍ॅप, ईमेलच्या माध्यमातून तक्रार करु शकणार आहेत (complain without hesitation Nagpur police new campaign).

नव्या मोहिमेअंतर्गत काय-काय सुविधा?

नागरिकांना पोलिसांसमोर आपलं म्हणणं किंवा तक्रार बिनधास्त करता यावी यासाठी नागपूर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या आहेत. तक्रार निवारण शिबिर, ज्यांना पोलीस स्टेशनला यायचं नाही पण तक्रार द्यायची आहे ते ईमेल किंवा व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार देऊ शकतात. अनेक भागात गुन्हेगारी असते मात्र भीतीपोटी त्यांच्या विरोधात कोणी पुढे येत नाही, असे नागरिक आपलं नाव गुप्त ठेऊन सुद्धा तक्रार देऊ शकतात, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

नागपूर पोलीस आयुक्तांची संकल्पना

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविली जात आहे. या उपक्रमाला सुरुवात झाली असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. काही घरगुती आणि संपत्तीच्या वादातील तक्रारी येत आहे. सोबतच पोलिसांना अनेकप्रकारे माहिती देणारे सुद्धा आता पुढे येत आहेत आणि भविष्यात आणखी जास्त येतील, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे या उपक्रमातून लोकांमध्ये पोलिसांची नकारात्मक असलेली छवी सुधारण्यासाठी आणि त्यातून गुन्हे कमी करण्यासाठी देखील मदत होईल.

हेही वाचा : पाच कुटुंबियांचा खून करणारा आरोपी जेलमध्ये अचानक खवळला, कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्यावर हल्ला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें