ही तर हद्दच झाली ! आता थेट रुग्णवाहिकेची चोरी

वर्ध्यात वेगळी आणि विचित्र चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. वर्ध्यात चोरट्यांनी थेट रुग्णवाहिकाच लंपास केली (theft of ambulance in Wardha).

ही तर हद्दच झाली ! आता थेट रुग्णवाहिकेची चोरी
वर्ध्यात रुग्णवाहिकेची चोरी

वर्धा : आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. कधी चोरटे घरफोडी करतात, कधी एटीएममशीन फोडून चोरी करतात, कधी ऑनलाईन चोरी करतात तर कधी दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांची चोरी करतात. मात्र, वर्ध्यात वेगळी आणि विचित्र चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. वर्ध्यात चोरट्यांनी थेट रुग्णवाहिकाच लंपास केली. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा अखेर तिचा शोध लागला. मात्र, रुग्णालयाच्या आवारातून उभी असलेली रुग्णवाहिकी नेमकी कुणी चोरुन नेली होती, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे (theft of ambulance in Wardha).

नेमकं प्रकरण काय?

वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून चक्क रुग्णवाहिका चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी शोध घेतला असता सिद्धार्थ नगरात ही रुग्णवाहिका आढळली. सिद्धार्थ नगरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एमएसडब्ल्यू वॉर्डासमोर पार्कींगमध्ये रुग्णवाहिका उभी होती (theft of ambulance in Wardha).

संबंधित प्रकार उघड कसा झाला?

रुग्णवाहिका चालक 18 जून रोजी ड्युटी संपल्यानंतर चावी ड्रायव्हरच्या रुममध्ये ठेवून घरी गेला. दुसऱ्या दिवशी चालक कर्तव्यावर आला असता त्यास रुग्णवाहिका उभी दिसली नाही. एम.एच. 32 जी 0151 असा या रुग्णवाहिकेचा नंबर होता. ही रुग्णवाहिका न दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला.

तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात रुग्णवाहिका सापडली

शोधाशोध केल्यानंतरही रुग्णवाहिका न दिसल्यामुळे चालकाने पोलीस ठाणे गाठले. चालकाने रुग्णवाहिका चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंदविल्यानंतर अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान पोलिसांच्या पथकाकडून तपास सुरू झाला. शोध सुरू असताना दोन तासांच्या कालावधीनंतर सिद्धार्थनगर परिसरात रुग्णवाहिका आढळली. पोलिसांनी रुग्णवाहिका ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणली.

हेही वाचा : दुकानदारावर गोळी झाडणार, तोच चिमुकलीची हाक, ‘बाबा’ ऐकून लुटारुंनी प्लॅन बदलला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI