AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानदारावर गोळी झाडणार, तोच चिमुकलीची हाक, ‘बाबा’ ऐकून लुटारुंनी प्लॅन बदलला

दुकानदारावर गोळी झाडून दुकान लुटायचे, असा आपला प्लॅन होता. मात्र आम्ही दुकानात शिरलो, तोच सहा वर्षांची मुलगीही तिथे आली आणि तिने 'बाबा' अशी हाक मारली, असं आरोपींनी सांगितलं.

दुकानदारावर गोळी झाडणार, तोच चिमुकलीची हाक, 'बाबा' ऐकून लुटारुंनी प्लॅन बदलला
फरिदाबाद लूट प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 9:25 AM
Share

गुरुग्राम : मनी ट्रान्स्फर करणाऱ्या दुकानदाराचा जीव त्याच्या चिमुकल्या लेकीमुळे वाचला. लूटमार केल्यानंतर त्याची गोळी झाडून हत्या करण्याचा चौघांच्या टोळीचा इरादा होता. मात्र अचानक दुकानात आलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीने ‘बाबा’ अशी हाक मारली. त्यामुळे मत परिवर्तन झालेल्या लुटारुंनी आपला प्लॅन बदलला. हरियाणातील फरिदाबाद शहरात घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Gunmen spare man’s life at shop in Faridabad after 6 years old daughter walks in)

चौघा आरोपींना अटक

फरिदाबादमधील मनी ट्रान्स्फर दुकानात जून महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या लूटमार प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरिदाबादचे रहिवासी असलेले सुमीत, मनोहर आणि राजस्थानच्या अजय, सौरव यांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून अवैध शस्त्रास्त्र आणि चोरीच्या बाईकही जप्त करण्यात आल्या आहेत. चौघंही 25 ते 30 वर्ष वयोगटातील आहेत.

चिमुकलीची हाक ‘बाबा’

फरिदाबाद शहरातील संजय कॉलनी परिसरात असलेल्या मनी ट्रान्स्फर दुकानात 9 जून रोजी लूट केल्याची कबुली आरोपींनी चौकशीदरम्यान दिली. दुकानदारावर गोळी झाडून दुकान लुटायचे, असा आपला प्लॅन होता. मात्र आम्ही दुकानात शिरलो, तोच सहा वर्षांची मुलगीही तिथे आली आणि तिने ‘बाबा’ अशी हाक मारली, असं आरोपींनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

मुलीला पाहून आम्ही गोळीबाराचा प्लॅन बदलला. ती जाईपर्यंत आम्ही वाट पाहत होतो. त्यानंतर आम्ही तिच्या वडिलांना धमकावलं, पैसे लुटले आणि कोणाचाही जीव न घेताच घटनास्थळावरुन पळालो, अशी माहिती आरोपींनी अटक झाल्यानंतर दिली. सुमीत हा टोळीचा म्होरक्या असून तो इतर सदस्यांना शस्त्र पुरवत असे.

सहा गुन्ह्यांची उकल

आरोपी सौरव पूर्वी ज्या कारखान्यात काम करत होता, त्याच्या मालकाचे अपहरण करण्याचीही आपली योजना होती, असी माहिती आरोपींनी चौकशीदरम्यान दिली. या चौघांच्या अटकेमुळे आतापर्यंत लूट, दरोडे, वाहन चोरी, अवैध शस्त्र अशा जवळपास सहा गुन्ह्यांची उकल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

रॉयल एनफिल्ड शोरूममधील चोरीचा छडा, सराईत चोरट्याला अखेर बेड्या

कुटुंबाचा अवैध शस्त्राचा कारखाना, मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

(Gunmen spare man’s life at shop in Faridabad after 6 years old daughter walks in)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.