कुटुंबाचा अवैध शस्त्राचा कारखाना, मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचं नाव लखनसिंह चव्हाण आहे. तो अवघ्या 21 वर्षांचा आहे. आरोपी मध्य प्रदेशातील बरुवानी जिल्ह्यातील रहिवासी आहे

कुटुंबाचा अवैध शस्त्राचा कारखाना, मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
देशी बनावटीच्या दहा पिस्तूल जप्त

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने मुलुंड परिसरातून 21 वर्षीय तरुणाला शस्त्रांसह अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीच्या दहा पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी ही शस्त्रं कोणाला पुरवण्यासाठी मुंबईत आला होता, याचा तपास केला जात आहे. आरोपीकडून 10 पिस्तुलांसोबत 12 काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत. तसेच केएफ मेडच्या 6 राउंडचाही समावेश आहे. (Madhya Pradesh man arrested in Mumbai Crime Branch in Illegal Weapon Case)

संपूर्ण कुटुंबाचा अवैध शस्त्र कारखाना

मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव लखनसिंह चव्हाण आहे. तो अवघ्या 21 वर्षांचा आहे. आरोपी मध्य प्रदेशातील बरुवानी जिल्ह्यातील रहिवासी असून त्याने मध्य प्रदेशात अवैध शस्त्रे बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. तिथे त्याचं संपूर्ण कुटुंब या व्यवसायात सहभागी असल्याचं उघड झालं आहे. तो मुंबईसह मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक ठिकाणी शस्त्रं पुरवत असल्याचा आरोप आहे.

खासगी वाहनांनी मध्य प्रदेशहून प्रवास

लखनसिंह आपल्या घरात शस्त्रे बनवून विक्री करत असे. तपासात असे समोर आले आहे की, त्याचे मामासुद्धा आपल्या कुटुंबासह या व्यवसायात सहभागी आहेत. आरोपी लखन सिंह याचे वय अवघे 21 वर्ष आहे. तो स्वत: अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरात शस्त्रं पोहोचवत होता. याबाबत कोणाला शंका येऊ नये म्हणून बहुतेकदा तो खासगी वाहनांनी प्रवास करुन शस्त्रं पुरवत मध्य प्रदेशात परत निघून जात होता.

या वेळीसुद्धा तो कोणाला तरी शस्त्र पुरवठा करायला आला होता. मुंबईत कोणाला इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची आवश्यकता होती, ही बेकायदा शस्त्रं एखाद्याच्या हत्येच्या कटाचा भाग म्हणून मागवण्यात आली होती की काय, याची चौकशी गुन्हे शाखा करत आहे.

टोळीतील सदस्यांमुळे आरोपी जाळ्यात

गुन्हे शाखेच्या पथकाला विश्वासार्ह सूत्रांकडून माहिती मिळाली होती की आरोपी एखाद्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे पोहोचवण्यासाठी मुंबईत येत आहे, त्यानुसार त्यांनी अटक केली. याच टोळीशी संबंधित व्यक्तींना काही काळापूर्वी गुन्हे शाखेने शस्त्रांसह अटक केली होती. त्या आधारे पोलिसांना लखनसिंहबाबत माहिती मिळाली. आता शस्त्र मागवणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

साताऱ्यातील मोरे गल्लीत शस्त्रसाठा, 55 बंदुका जप्त

(Madhya Pradesh man arrested in Mumbai Crime Branch in Illegal Weapon Case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI