AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिडीओ व्हायरल करुन पूर्णा नदीत उडी, अकोल्यातील युवकाच्या आत्महत्येचं गूढ उकललं

अकोल्यातील मोठी उमरी परिसरात राहणाऱ्या अजय सुरेश काटोले या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवला होता. 27 जुलै रोजी गांधीग्राम येथील पूर्णा नदीत सायंकाळच्या सुमारास उडी घेऊन या युवकाने आत्महत्या केली होती

व्हिडीओ व्हायरल करुन पूर्णा नदीत उडी, अकोल्यातील युवकाच्या आत्महत्येचं गूढ उकललं
मयत अजय काटोले
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 10:48 AM
Share

अकोला : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करुन आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह अखेर पूर्णा नदीपासून 10 किलोमीटर अंतरावर सापडला. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नेर धामना गावाजवळील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला. अजय काटोलेच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये आपला नवरा, दीर आणि सासू या तिघांविरुद्ध आपला छळ होत असल्याची तक्रार दिली होती. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील मोठी उमरी परिसरात राहणाऱ्या अजय सुरेश काटोले या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवला होता. 27 जुलै रोजी गांधीग्राम येथील पूर्णा नदीत सायंकाळच्या सुमारास उडी घेऊन या युवकाने आत्महत्या केली होती. अजय आपली आई, भाऊ यांच्यासह राहत होता. मात्र अजयच्या लग्नानंतर पैसे आणि त्यातील हिश्शांवरुन काटोले परिवारात सतत वाद होत होते.

पत्नीची कुटुंबीयांविरोधात तक्रार

यातच अजयच्या पत्नीने आपला नवरा, दीर आणि सासू या तिघांविरुद्ध आपला छळ होत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने अजय कटोले खचून गेला होता. आपल्यामुळे आपल्या आई आणि भावाला होत असलेला त्रास सहन न झाल्याने अखेर अजयने हे कठोर पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याचा अंदाज आहे. यावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार दिवसांपासून शोध

अकोला शहरातल्या मोठी उमरी भागात राहणाऱ्या अजय सुरेश काटोलेने पूर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेतली होती. पुलाच्या बाजूला ठेवलेले पाकीट, मोबाईल आणि आधार कार्ड यामुळे युवकाची ओळख पटली. गेल्या 4 दिवसापासून त्याचा शोध सुरु होता. काल सायंकाळी त्याचा मृतदेह 10 किलोमीटर दूर उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत नेर धामना गावाजवळ सापडला.

यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे सुनील कल्ले, हरिहर निमकांडे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रालतो विज्ञान महाविद्यालय अकोलाचे समन्वयक डॉ. सुधीर कोहचाळे, सत्यप्रकाश आर्य, अक्षय श्रीनिवास, नितीन कोलटक्के, पंकज श्रीनाथ, अनिल पागृत, विठ्ठल पाकधूने यांनी शोधकार्य राबवले. पुढील तपास दहीहंडा पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

धावत येऊन पुलावर पाकीट-मोबाईल ठेवलं, नंतर नदीत उडी घेत युवकाची आत्महत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.