धावत येऊन पुलावर पाकीट-मोबाईल ठेवलं, नंतर नदीत उडी घेत युवकाची आत्महत्या

नदीला भरपूर पाणी असल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला आणि वर परत आलाच नाही, असंही उपस्थितांनी सांगितलं. घरगुती वादातून अजय काटोले याने आत्महत्या केल्याची चर्चा यावेळी होती

धावत येऊन पुलावर पाकीट-मोबाईल ठेवलं, नंतर नदीत उडी घेत युवकाची आत्महत्या
अकोल्यात पूर्णा नदीत तरुणाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 12:23 PM

अकोला : नदीच्या पुलावरुन उडी घेत एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. धावत येऊन युवकाने पुलावर आपले ओळखपत्र, पाकीट आणि मोबाईल ठेवले. त्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने पूर्णा नदीत उडी घेतली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

अजय काटोले असे आत्महत्या केलेल्या 35 वर्षीय युवकाचे नाव आहे. तो अकोला शहरातल्या उमरी भागात राहत होता. अकोला जिल्हातल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन उडी मारत त्याने आत्महत्या केली. अजय पुलावर पळत आला. आपले ओळखपत्र, पाकीट आणि मोबाईल ठेऊन काही कळायच्या आतच त्याने पुलावरुन उडी घेतली, अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.

नदीला भरपूर पाणी असल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला आणि वर परत आलाच नाही, असंही उपस्थितांनी सांगितलं. घरगुती वादातून अजय काटोले याने आत्महत्या केल्याची चर्चा यावेळी होती, मात्र नेमकं काय कारण आहे, याचा तपास दहीहंडा पोलिस करत आहेत.

वसईत विवाहितेची आत्महत्या

दुसरीकडे, सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या मर्सेस गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्मिता डिसिल्वा (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

काय घडलं होतं?

स्मिताचे पती विवेक डिसिल्वा (वय 39) काही दिवसांपूर्वी परराज्यात जाऊन आले होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. याच वेळी सासू सासऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. सर्वांना वसईच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या उपचारा दरम्यान पतीची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. त्यामुळे आता कसे होणार, या धास्तीने पत्नीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पत्नीने एक सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले असल्याचेही समोर आले आहे. वसई पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती चिंताजनक, धसक्याने वसईत विवाहितेची आत्महत्या

पत्नी आणि मुलं खरेदीसाठी गेली, 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

(Akola Youth Commits Suicide in Purna River)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.