Chandrapur Murder | डोक्यात जोरदार प्रहार, 35 वर्षीय महिलेची नदीकाठी हत्या, तीन मुलं पोरकी

चंद्रपूर शहराच्या रमाबाईनगर भागात महिलेची हत्या झाल्याची घटना उजेडात आली आहे. मना मनोज कोठार असं मयत महिलेचं नाव आहे. वजनदार वस्तूने डोक्यात प्रहार करत महिलेची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Chandrapur Murder | डोक्यात जोरदार प्रहार, 35 वर्षीय महिलेची नदीकाठी हत्या, तीन मुलं पोरकी
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 12:17 PM

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर भागात महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झरपट नदीच्या काठावर 35 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. महिला वर्षभरापासून पतीपासून विभक्त राहत होती. मात्र तिची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर शहराच्या रमाबाईनगर भागात महिलेची हत्या झाल्याची घटना उजेडात आली आहे. मना मनोज कोठार असं मयत महिलेचं नाव आहे. वजनदार वस्तूने डोक्यात प्रहार करत महिलेची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महिलेला तीन मुलं, पतीपासून विभक्त

35 वर्षीय मयत महिलेला 3 मुलं आहेत. तर पती गेल्या वर्षभरापासून तिच्यापासून विभक्त राज्याबाहेर राहत आहे. मात्र ही हत्या नक्की कुणी आणि कोणत्या कारणावरून केली, याचा तपास पोलीस करत आहेत. सकाळीच घडलेल्या या घटनेने अल्प उत्पन्न गटातील श्रमिकांची वस्ती असलेल्या रमाबाई नगरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

वजनदार वस्तूने डोक्यात प्रहार करुन हत्या

स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मना मनोज कोठार यांची एखाद्या वजनदार वस्तूने डोक्यात प्रहार करुन हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

कौटुंबिक कलह घेऊन पोहोचला ठाण्यात, तिथेच ह्रदविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू

आधी धमकावून कबर खणायला लावली, नंतर गोळ्या झाडून त्यातच पुरला तरुणीचा मृतदेह

स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक