Murder | आधी धमकावून कबर खणायला लावली, नंतर गोळ्या झाडून त्यातच पुरला तरुणीचा मृतदेह

अमांडा अल्बाचने गुपचूप काही संशयितांचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. अमांडा हे सर्व करत असताना एकाची नजर तिच्यावर पडली. त्याने फोटो काढण्यास आक्षेप घेतला. त्याच वेळी, त्या सर्व संशयितांनी 21 वर्षीय अमांडा अल्बाचला जीवे ठार मारण्याचा कट रचला होता.

Murder | आधी धमकावून कबर खणायला लावली, नंतर गोळ्या झाडून त्यातच पुरला तरुणीचा मृतदेह
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह

ब्राझिलिया : तरुणीला तिची कबर खोदायला लावून नंतर तिची हत्या करण्यात आली. ब्राझीलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या तरुणीला अंमली पदार्थ तस्करांनी धमकावून खड्डा खणायला लावला होता. त्यानंतर गोळी झाडून तिची हत्या केली. ब्राझीलमधील सँटा कटरिना (Santa Catarina) राज्यात ही घटना घडली. 21 वर्षीय अमांडा अल्बाच (Amanda Albach Murder Case) असं मयत तरुणीचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

घटनेच्या दिवशी अमांडा अल्बाच तिच्या एका मैत्रिणीसोबत बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. जिथे वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती, त्या सँटा कटरिना भागात त्यांचे इतर काही मित्रही त्यांना भेटले. स्थानिक पोलिस आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाढदिवसाच्या पार्टीत काही गुंड प्रवृत्तीचे तरुण देखील उपस्थित होते. त्यांच्या हालचाली सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत होत्या. हे सर्व संशयित एखाद्या मोठ्या ड्रग रॅकेटचे सदस्य असल्यासारखे दिसत होते.

संशयितांचे फोटो काढणं महागात

संधी मिळताच अमांडा अल्बाचने गुपचूप काही संशयितांचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. अमांडा हे सर्व करत असताना एका संशयिताची नजर तिच्यावर पडली. त्यावर त्याने फोटो काढण्यास आक्षेप घेतला. त्याच वेळी, त्या सर्व संशयितांनी 21 वर्षीय अमांडा अल्बाचला जीवे ठार मारण्याचा कट रचला होता.

उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांची धावाधाव

बर्थडे पार्टी होऊन बराच वेळ होऊनही अमांडा घरी परतली नाही. त्यावेळी कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. मोबाईल नंबर बंद येत होता. त्यामुळे प्रकरण संशयास्पद असल्याचे पाहून कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या तपासात एक संशयित अंमली पदार्थ विक्रेता त्यांच्या हाती लागला. त्याने अमांडा अल्बाचच्या हत्येची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यावरुन पोलिसांना समजले की, अमांडाची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी तिला जबरदस्तीने धमकावून तिला कबर खोदायला लावली होती. कबर खोदल्यानंतर अंमली पदार्थ तस्करांनी तिला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह समुद्र किनारी असलेल्या त्याच कबरीत पुरला.

संबंधित बातम्या :

CCTV | हळदीच्या कार्यक्रमात 36 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, हायप्रोफाईल चोरटे मोकाट

Switzerland Suicide Machine | एका मिनिटात वेदनेशिवाय मृत्यू, ‘डॉ. डेथ’च्या संशोधनाला कायदेशीर मंजुरी

VIDEO | मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाडी पेटली, प्रवासी बालंबाल बचावले, कार जळून खाक

Published On - 10:56 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI