अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून दिरंगाई, थेट नितीन गडकरींच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न

केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या घराजवळ एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 1 ऑक्टोबर रोजी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. या व्यक्तीचे नाव विजय पवार असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून दिरंगाई, थेट नितीन गडकरींच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न
NAGPUR MAN SUICIDE
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 02, 2021 | 9:06 PM

नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या घराजवळ एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 1 ऑक्टोबर रोजी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. या व्यक्तीचे नाव विजय पवार असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याचे दिले होते आश्वासन

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विजय पवार यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. विजय पवार हे मुळचे जिल्हा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. या व्यक्तीला पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे रुंदीकरण, सिमेंट रस्त्याचा दर्जा सुधारणे तसेच रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याचे काम गणेश विसर्जनानंतर केले जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. परंतु गणेश विसर्जन झाल्यानंतरदेखील त्याची पुर्तता झाली नाही.

दिरंगाईच्या निषेधार्थ आत्महत्या करण्याचा प्रयत्न 

प्रशासनाच्या याच दिरंगाईच्या निषेधार्थ पवार यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्यामुळे अनर्थ टळला. सध्या पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सध्या धोक्याबाहेर आहेत..

औरंगाबादेत तरुणाची गळफास लावून आत्महत्या

दुसरीकडे एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका युवकाने औरंगाबाद शहरात आत्महत्या केल्याची घटना घडली.  शहरातील बाबा चौकातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या किशोर भटू जाधव (29 वर्षे)  याने गुरुवारी दुपारी खोलीबाहेर गळफास घेतला. किशोर जाधव (Kishor Jadhav) हा दोन वर्षे धुळ्यात (Dhule) तर औरंगाबादमध्ये (Aurangabad) चार वर्षांपासून परीक्षेच्या सरावासाठी राहत होता. काल आत्महत्येपूर्वी (Suicide) त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात मित्र-मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.

रात्री आईजवळ नाराजी व्यक्त केली होती

गुरुवारी सकाळी किशोरने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. दरम्यान, आदल्या दिवशी बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास किशोरने आई-वडिलांना फोन केला होता. मला स्पर्धा परीक्षेत कमी गुण मिळाले असून अपयश आल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. वडिलांशी बोलताना त्याने ही नाराजी व्यक्त केली नाही. मात्र आईशी बोलताना त्याने निराशा दर्शवली होती. मात्र खचून न जाता अजून प्रयत्न कर, नाही तर घरी ये, अशी समजूत आई-वडिलांनी काढली होती.

इतर बातम्या :

बलात्काराचा आरोप, आध्यात्मिक बाबाला कांदिवली पोलिसांकडून गुजरातमध्ये जाऊन बेड्या

बेडवरुन महिला रुग्ण गायब, सुरक्षा रक्षकानं बाथरुमची झडती घेतली तर धक्कादायक घटना उघड

पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून देवाघरी जायचा निर्णय; माय-लेकीचा गळफास, चुटपूट लावणारी सुसाईड नोट

(man try suicide in front of nagpur house of nitin gadkari)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें